*संकोच…
लेखिका: अंजली रहाणे/थेटे
*संकोच हा वैरी सत्याचा*
*संकोच हा घात नात्याचा*
संकोच अर्थात संशय ही अशी ठिणगी आहे ज्यामुळे अनेक वणवे पेटले अन् क्षणात सारं उध्वस्त झालं. संकोच हे असे ग्रहण आहे जे एकदा माणसांमध्ये किंवा नात्यांमध्ये लागले की कितीही वेध पाळले तरीही त्या नात्याची हानी झाल्याशिवाय ग्रहण ही संपत नाही. सर्पदंश झाल्यानंतर ही इतकी कठीण विषबाधा होणार नाही इतके विष हया संशयाने पसरते. जरा बारकाईने निरीक्षण केले तरी हा संशयाचा विषाणू अगदी घराघरामध्ये सऱ्हास पसरतो आणि याचे मूळ कारण बदलणारी वैचारिक पातळी आणि हीच वैचारिक पातळी अमानुष आणि माजवी कृत्यात जलद गतीने वाढ करते.
*भग्न मनात संकोचाला* *कवटाळून ठेवलं की विचारांचे* *नागडेपण कृत्यात उतरते.* जिथं सुपीकता वाढते तिथं नापीक आणि शापित बीज रुजवले की, तिथून फक्त उद्धवंस विचारच जीवनात परावर्तित होतात. नात्याप्रती कठोर असणं ही काळजी परंतू नात्याप्रती साशंक असणं हा अविश्वास त्याचबरोबर अनेक ऐतहासिक आणि अध्यात्मिक प्रमाण आपल्यासमोर आधीच मांडले आहे यासाठी की,आपण सात्विक वृत्तीची जोपासना करावी परंतु दरवेळी मनाच्या विकृतीला साखळदंडांनी करकचून बांधून अजुन अनिष्ट गोष्टींना जीवनात भक्कम करत जाणारा समाज दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विशेषतः कौटुंबिक पातळीवर संशय हा विंचवासारखा आहे की एकदा नात्यांना चावला की त्याचा ठणक आयुष्याच्या अखेरपर्यंत लागतो. वेळप्रसंगी ठणक कमी व्हावा यासाठीच वैचारिक औषधोपचार करतो ही परंतू त्याचा असर औषध असेपर्यंतच राहतो. कित्येकदा त्यात गतप्राण होताना ही दिसतात. यासाठीच घटकाभर संकोचाचं जाळं बाजुला करून आपल्यात असलेल्या रुपेरी पंखांनी स्वच्छ नितळ मनात विहार करावा तेव्हाच कळेल की आपल्या मनाच्या राऊळात प्रेमरूपी परमेश्वर वास करतो.
बुध्दीवर होणारा संशयाचा विपरीत परिणाम विनाशकारी असतो. तत्पूर्वी संकोचाची शहानिशा करावी जेणेकरून स्वतः पासून ते सर्वोतोपरी शांतता पसरेल आणि आपोआप गैरसमजुतीवर होणाऱ्या गैरव्यवहाराना वेळीच आळा बसेल . कालांतरानं दुरावत चाललेले नाते अथवा विचार आपसूकपने आपले माणसं आणि आपले विचार हे प्रेम आपुलकी आदरभाव यावर केंद्रित होतील.
*संकोचाने केली सारी माती*
*भ्रष्ट होऊनी भंगली मती…*
*वेचतील जेव्हा वैचारिक मोती..*
*टिकतील सारी नाती गोती..*
✍️ अंजली रहाणे/थेटे
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718 लोकशाही प्रणालीत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…
संडे अँकर तेच गद्दार, तेच हिंदुत्व, तीच टीका, तीच भूमिका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या…