महाराष्ट्र

हिंदीमुळे प्रादेशिक भाषांमध्ये समन्वय

अमित शहा : अखिल भारतीय राजभाषा संमेलन

मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित हिंदी दिन आणि सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रादेशिक भाषा आणि हिंदी यांच्यातील समन्वयावर भर दिला. भारतीय भाषांचे संवर्धन आणि विकास हा केंद्र सरकारचा दृढ संकल्प असल्याचे स्पष्ट करत शहा यांनी प्रादेशिक भाषांची तुलना कमळाच्या सुंदर पाकळ्यांशी केली. या सर्व पाकळ्यांना एकत्र जोडून ठेवणारी आणि त्यांच्यात समन्वय साधणारी हिंदी ही या कमळाची ’मध्यमणी’ असायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, महाराष्ट्राला देशातील सवार्ंत मोठे बहुभाषिक राज्य संबोधून त्यांनी येथील मराठी, कोकणी, गुजराती, सिंधी, कन्नड आदी भाषांच्या सहअस्तित्वाचे व विकासाचे कौतुक केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेत स्वराज्य आणि स्वधर्मासोबतच ’स्वभाषा’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक होता, याकडे शहा यांनी लक्ष वेधले. महाराजांनी प्रशासनात मराठी भाषेला महत्त्व देऊन स्वतंत्र राजकोष तयार केला आणि खर्‍या अर्थाने मराठीला शासनाच्या भाषेचा दर्जा मिळवून दिला, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सर्वप्रथम मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे महत्त्वाचे काम केल्याची आठवण त्यांनी करून दिली. ’वंदे मातरम’ला सरकारी समारंभांमध्ये पुन्हा पूर्ण स्वरूपात आणि सन्मानाने सादर करण्याचे श्रेयही त्यांनी मोदी सरकारला दिले.

मराठी आई, इतर सर्व भाषा मावशी : फडणवीस
संमेलनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषिक समन्वयाचा अतिशय भावनिक आणि समर्पक दाखला दिला. माझी आई मराठी आहे, मात्र देशातील इतर सर्व भाषा माझ्या मावशीसारख्या आहेत. आईचा गौरव करतानाच मावशीचाही पूर्ण सन्मान राखला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांची आकलनक्षमता आणि गुणवत्ता वाढते, यावर भर देत फडणवीस यांनी ’एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना साकारण्यासाठी सर्व भारतीय भाषांचा आदर करण्याचे आवाहन केले. जगातील प्रगत देश ज्याप्रमाणे आपल्या मातृभाषेचा अभिमानाने वापर करतात, त्याच धर्तीवर भारतानेही प्रशासकीय आणि दैनंदिन कामकाजात आपल्या समृद्ध भाषांचा अधिकाधिक वापर करावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

Hindi promotes harmony among regional languages

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago