नाशिक

नागपूर अधिवेशनावर आशा, गटप्रवर्तकांचा मोर्चा

आरोग्यमंत्री व राज्यमंत्री यांची शिष्टमंडळाशी चर्चा

नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा, गटप्रवर्तक संघटनेतर्फे नागपूर येथील हिवाळी
अधिवेशनावर काढण्यात आलेल्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोर्चात राज्यभरातील आशा व गटप्रवर्तक सहभागी झाले. संघटनेचे राज्याध्यक्ष राजू देसले यांनी याबाबत माहिती दिली.
राज्यातील 70 हजार आशा स्वयंसेविका व 3,500 पेक्षा जास्त गटप्रवर्तक राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अत्यावश्यक सेवा बजावत असून, गेल्या काही महिन्यांपासून मानधनाचा अनियमित पुरवठा झाल्याने कार्यकर्त्यांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप संघटनेने केला. मुंबईत 9 ऑक्टोबर रोजी आरोग्यमंत्री व आरोग्य विभाग आयुक्तांसोबतची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर राज्यव्यापी मोर्चाचा निर्णय घेण्यात आला होता.

संघटनेच्या प्रमुख मागण्या

दर महिन्याच्या 5 तारखेला मानधन नियमित देणे 5जी मोबाइल, सिम व अमर्यादित डेटा मिळेपर्यंत ‘मात्रा अ‍ॅप’वरील ऑनलाइन कामांचा बहिष्कार अंगणवाडी सेविकांप्रमाणे पाच हजार रुपये दिवाळी भेट गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा, नवीन वेतनश्रेणी आणि किमान 35 हजार रुपये वेतन द्यावे. आशांचे निवृत्ती वय 65 वर्षे करावे. अथवा 5,000 रुपये मासिक निर्वाह भत्ता मातृत्व वंदना योजनेचा थकीत मोबदला तत्काळ देणे आशांना चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून कायम करणे प्रसूती रजा, आजारी रजा, बायोमेट्रिक सक्तीचा विरोध प्रत्येक जिल्हा/तालुक्यात ‘आशा कक्ष’ सुरू करणे नैसर्गिक मृत्यूनंतर कुटुंबीयांना 10 लाख रुपये भरपाई 25 आशांमागे एक गटप्रवर्तक असा नियम करून रिक्त पदे भरावीत.

शिष्टमंडळाची मंत्र्यांसोबत चर्चा

या सर्व मागण्यांचे निवेदन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना शिष्टमंडळाने दिले. यावेळी मंत्रिमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुंबईत लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात राज्याध्यक्ष राजू देसले, सरचिटणीस मंदा डोंगरे, राष्ट्रीय अध्यक्षा मंगला पांडे, मुगाजी बुरूड, गटप्रवर्तक गुली पावरा, ज्योत्स्ना राऊत, संगीता हिवराळे, राज्य सरचिटणीस श्याम काळे, विनोद झोडगे, दिलीप उटाणे, मुगाची बुरूड आदींचा समावेश होता.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

14 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

14 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

15 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

15 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

15 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

15 hours ago