नाशिक

गडकरी चौकात नागरिकांना झाले बिबट्याचे दर्शन

वन विभाग-पोलिसांची शोधमोहीम निष्फळ

नाशिक : प्रतिनिधी
भोंसला महाविद्यालय परिसरात बिबट्या पकडल्यानंतर शुक्रवारी (दि. 12) पहाटे गडकरी चौक परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. वन विभाग आणि पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवली. मात्र, बिबट्याने गुंगारा दिला.
पहाटे 4.30 वाजता रात्रपाळीच्या कर्तव्यावर असणार्‍या पोलीस अंमलदारांना बिबट्या दिसला. तत्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी, नाशिक शहर पोलिसांचे श्वानपथक (गुगल श्वान), वन्यप्राणी बचाव पथक व रेस्क्यू नाशिक डिव्हिजनचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता बिबट्याचा वावर स्पष्ट दिसल्याने अधिकार्‍यांनी तत्काळ शोधमोहीम हाती घेतली. थर्मल ड्रोनच्या मदतीने तसेच श्वानपथकासह विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, शासकीय निवासस्थान परिसर, नाशिक शहर पोलीस उपायुक्त कार्यालय परिसर आणि मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कार्यालय या संपूर्ण भागात तपास करण्यात आला. मात्र, दीर्घ शोधमोहिमेनंतरही बिबट्या सापडला नाही. परिसरात फिरताना दक्षता घ्यावी. विशेषत: लहान मुलांची काळजी घ्यावी. कुठेही बिबट्याचा किंवा इतर वन्यप्राण्यांचा वावर आढळल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

15 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

15 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

15 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

15 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

16 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

16 hours ago