पुण्याच्या व्यक्तीचा दगडाने ठेचून खून
नाशिक : प्रतिनिधी
शहरात खुनाची मालिका सुरूच असून आज शुक्रवार (दि.20)रोजी भल्या पहाटे पुणे येथील पन्नास वर्षीय व्यक्तीचा पूर्णिमा बस स्टॉप जवळ खून झाल्याची घटना घडली आहे, पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.
खून झालेल्या यक्तीचे नाव हरीश पाटील असून तो पुणे येथील राहणार असल्याचे त्याच्या आधार कार्ड वरून स्पष्ट झाले आहे, लुटमारीच्या प्रकरणातून दगडाने ठेचून खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे, परिसरातील सीसीटीवी वरून मारहाण करणारे चार ते पाच जणांचे टोळके आहे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, आचल मुदगल घटनास्थळी तपास करीत आहेत.