शुक्रवार, २३ डिसेंम्बर २०२२
. मार्गशीर्ष अमावस्या, हेमंत ऋतू.
राहू काळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज अनिष्ट दिवस, दर्श – वेळा अमावस्या.
चंद्र नक्षत्र – मूळ
मेष:- काही अकल्पित घटना घडू शकतात. त्यातून लाभ होतील. राजकीय तत्वांच्या आहारी जाऊ नका. सरकारी कामात चालढकल नको.
वृषभ:- आरोग्य विषयक चिंता निर्माण होऊ शकतात. विश्रांती घ्या. सरकारी कामात अडथळे येतील. कायदे पाळा.
मिथुन:- विरोधक पराभूत होतील. कुलदेवतेची आराधना लाभदायक ठरेल. यश मिळेल. मात्र कामाच्या ठिकाणी वादविवाद संभवतात. अधिक जबाबदारी अंगावर येण्याची शक्यता आहे.
कर्क:- आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. व्यवसायवृद्धी होईल. प्रवासाचे नियोजन बिघडेल. कामाच्या वेळेत बदल होईल.
सिंह:- सौख्य लाभेल. स्पर्धेत यश मिळेल. अभ्यासात प्रगती होईल. शुभ समाचार समजतील. अचानक धनलाभ संभवतो.