शेतकरी, वाहनचालक अडचणीत; ऊसतोडणीतही खोळंबा
निफाड : तालुका प्रतिनिधी
भरवस फाटा ते चास- कोळपेवाडी-दर्डे फाटा राज्य मार्ग क्रमांक 7 वरील भरवस फाटा ते सातमोर्यादरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील त्रुटींमुळे शेतकरी व वाहनचालक अडचणीत आले आहेत. मुख्य रस्त्याची उंची वाढवण्यात आली. मात्र, जोडणार्या शिवार रस्त्यांना आवश्यक उतार न दिल्याने शेतातून ऊस मुख्य रस्त्यावर आणणे कठीण झाले आहे. परिणामी परिसरात ऊसतोडणी व ऊस वाहतूक खोळंबली आहे. ऊस शेतातच पडून राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
ऊस वाहतुकीचा हंगाम सुरू असताना शेतातून ऊस बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीचा वापर केला जातो. परंतु मुख्य रस्ता उंच केल्यानंतर शिवार रस्त्यांची योग्य जोडणी व उतार न केल्याने ट्रॅक्टर-ट्रॉलींना मुख्य रस्त्यावर येताना मोठी कसरत करावी लागत आहे.
ठेकेदाराच्या या दुर्लक्षामुळे ऊस वाहतुकीचा मार्ग खडतर बनला आहे. याच मार्गावर कामादरम्यान टाकलेला मुरूम, दगडगोटे, शेरवट माती आणि अपूर्ण कामामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर-ट्रॉलींची मोठी वर्दळ असताना रस्त्यावरील धोकादायक अवस्थेमुळे ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर पलटी होण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे शेतकरी व चालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी व शेतकर्यांच्या सोयीसाठी काम होत असताना शिवार रस्त्यांना उतार न देणे, रस्त्यावर माती-दगडगोटे राहणे आणि कामाची संथगती यामुळे उलट त्रास होत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून शिवार रस्त्यांना योग्य उतार व जोडणी करून द्यावी, वाहतुकीतील अडथळे दूर करावेत आणि सुरक्षा उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.
Tractor overturns due to flaws in farm road construction
सिडको : प्रतिनिधी सातपूर-अंबड लिंकरोडवरील दत्तमंदिर चौफुली परिसरात पशुपतिनाथ मंदिराजवळ शुक्रवारी (दि. 27) सायंकाळी सहाच्या…
त्र्यंबकेश्वर नगर परिषदेची पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर नगर परिषदेसाठी 25 नग फिरती शौचालये…
मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव-चाळीसगाव फाटा परिसरातील लोणवाडे शिवारात असलेल्या प्लास्टिक गोडावूनला गुरुवारी (दि. 26) रात्री…
पालकमंत्री : शहरात तूर्तास पाणीकपात टळली नाशिक : प्रतिनिधीं संभाव्य दुष्काळाचे संकट लक्षात घेता ऑगस्टअखेरपर्यंत…
विशिष्ट मक्तेदाराला लाभ देण्यासाठीचे प्रयत्न? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाने 34 प्रकारची अत्याधुनिक…
विकासकामांना जुन्या देयकांचा विळखा; लोकप्रतिनिधी आक्रमक नाशिक : प्रतिनिधी जिल्हा नियोजन समितीत (डीपीसी) नाशिक जिल्ह्यासाठी…