सोमवार, २० फेब्रुवारी २०२३.
माघ अमावस्या. शिशिर ऋतू.
राहूकाळ- सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्रनक्षत्र :’धनिष्ठा’ आज अनिष्ट दिवस आहे. सोमवती अमावस्या. (तिथी दुपारी १२.३६ पर्यंत) आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.
मेष:- अनुकूल दिवस आहे. येणी वसूल होतील. उत्तम आर्थिक लाभ होतील. मन प्रसन्न राहील.
वृषभ:- कामाच्या ठिकाणी अपमान होऊ शकतो. जबाबदारी वाढेल. विरोधक नामोहरम होतील.
मिथुन:- हितशत्रूंच्या कारवाया वाढतील. अंगावर घेतलेले काम चांगल्यापद्धतीने पार पडाल. शिक्षणात प्रगती होईल.
कर्क:- उदास वाटेल. वाहने जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या. मन शांत ठेवा. ध्यानधारणा करा.
सिंह:- जोडीदारासाठी खर्च कराल. भागीदारीत यश मिळेल. सरकारी कामे पुढे सरकतील. नेतृत्वगुण सिद्ध होईल.
कन्या:- अधिकाराचा योग्य वपर कराल. आर्थिक प्राप्तीसाठी उत्तम दिवस आहे. मात्र मोठे करार आज नकोत.
तुळ:- कामात अडथळे येतील. वादविवाद टाळा. मन शांत ठेवा. स्पर्धेत मात्र यश मिळेल. प्रवासाचे बेत पुढे ढकलले जातील.
वृश्चिक:- शेतीची कामे पुढे योग्य वेळेत होतील. जमीन व्यवहारात यश मिळेल. मातेकडून लाभ होतील.
धनु:- संमिश्र दिवस आहे. धनलाभ होणार आहे. आरोग्य चांगले राहील. मनासारखी बढती/बदली होईल.
मकर:- खर्चात वाढ होणार आहे. मात्र त्याची भरपाई देखील होईल. पराक्रम गाजवाल.
कुंभ:- मेजवानी मिळेल. ओळखीतून लाभ होतील. घरात बदल कराल. गुप्तशत्रूपासून सावध रहा.
मीन:- खर्चात वाढ होणार आहे. संयम बाळगा. क्रोध आवरा. अधिकाराचा दुरुपयोग होऊ देऊ नका. संशयाचे वातावरण नको.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –