निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगितीची मागणी
नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने शिवसेना आणि पक्ष चिन्ह या संदर्भातील दिलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी, या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेवर सुनावणी होणार की नाही यावर आज सुप्रीम कोर्टात निर्णय होण्याची शक्यता आहे. ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार ही शक्यता गृहीत धरून शिंदे गटाने कॅवेठ दाखल केले आहे,
उद्यापासूनच सत्ता संघर्षवर सलग सुनावणी होणार आहे, त्यामुळे सत्तासंघर्ष आणि आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाला दिलेलं आव्हान अशी एकत्रित सुनावणी होते की नाही याचे उत्तर उद्या मिळणार आहे.