सोमवार, १६ मे २०२२. वैशाख पौर्णिमा. वसंत ऋतू. शुभकृत संवत्सर.
राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
आज चंद्र गुरूच्या ‘विशाखा’ नक्षत्रात आहे. दुपारी १.०० नंतर चांगला दिवस आहे. आज परीघ योग आहे. *बुद्धपूर्णिमा आहे*
मेष:- अध्यात्मिक अनुभूती मिळेल. गुरू सन्निध लाभेल. काही सुखद घटना घडतील.
वृषभ:- खर्चात वाढ होईल. कर्जे मंजूर होतील. पर्यटन घडेल. जोडीदाराला आनंद द्याल.
मिथुन:- संमिश्र दिवस आहे. स्पर्धेत यश मिळेल. कामात अडथळे यातील. संध्याकाळ आनंदाची.
कर्क:- खर्चात वाढ होईल. कामे रेंगाळतील. महत्वाची कामे आज नकोत.
सिंह:- आर्थिक आवक चांगली राहील. गृहसौख्य लाभेल. मन शांत राहील. प्रवासात ओळखी होतील.
कन्या:- खर्चात वाढ संभवते. दुःखदायक दिवस आहे. व्यसने टाळा. काळजी घ्या. प्रवासात त्रास संभवतो.
तुळ:- मन प्रसन्न राहील. कलाप्रांतात चमक दाखवाल. अनामिक भीती दाटून येईल. शत्रूभय जाणवेल.
वृश्चिक:- योग्य कारणासाठी खर्च होईल. अधिकाराच्या जोरावर आर्थिक उन्नती होईल. उत्तरार्ध अनुकूल आहे.
धनू:-पूर्वार्धात उत्तम दिवस आहे. आत्मचिंतन कराल. मनासारखी कामे होतील.
मकर:- पूर्वार्ध अनुकूल आहे. कामे पूर्ण करा. अध्यात्मिक अनुभूती मिळेल.
कुंभ:- सौख्य लाभेल. स्वप्ने साकार होतील. मन शांत राहील. संध्याकाळ आनंदाची.
मीन:- काळजी घ्या. संमिश्र दिवस आहे. संयम बाळगा. आर्थिक नियोजन करा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी