राशिभविष्य

शुक्रवार, १० जून २०२२.

जेष्ठ शुक्ल दशमी/ एकादशी. ग्रीष्म ऋतू. उत्तरायण. शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००

“आज क्षय दिन, *निर्जला (स्मार्त) एकादशी* आहे” आज ‘वरिया’ योग आहे.

चंद्र नक्षत्र – चित्रा

मेष:- महत्वची कामे सकाळी पूर्ण करा. प्रिय व्यक्तीवर खर्च कराल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल.

वृषभ:- उत्तम यश मिळेल. कामे मार्गी लागतील. कठोर निर्णय घ्याल. दुपारनंतर आर्थिक लाभ होतील.

मिथुन:- कामात अडथळे येतील. खर्चात वाढ होईल. महत्वाची कामे सकाळी नकोत.

कर्क:- भाऊबंदकी टाळा. मुत्सद्दी बनाल. हितशत्रू डोके वर काढतील. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह:- यशस्वी दिवस आहे. आर्थिक आवक चांगली राहील. धनलाभ होतील. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील.

कन्या:- उत्तम दिवस आहे. सखोल विचार कराल. मान सन्मान मिळतील.

तुळ:- दुपारनंतर आत्मविश्वास वाढेल. नेमकी भूमिका घ्याल. कामात दगदग होईल.

वृश्चिक:- पूर्वार्ध अनुकूल आहे. संधीचे सोने करा. अंदाज अचूक ठरतील. कायदेशीर कामात यश मिळेल.

धनु:- उत्तम दिवस आहे. येणी वसूल होतील. अचानक धनलाभ संभवतो. आध्यत्मिक लाभ होतील.

मकर:- अधिकारात वाढ होईल. कामाचे कौतुक होईल. छोटे प्रवास घडतील. जेष्ठ नागरिक योग्य सल्ला देतील.

कुंभ:- सकाळ काहीशी संथ आहे. नंतर मात्र सौख्य लाभेल. नात्यातून लाभ होतील. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील.

मीन:- कुटुंब खुश होईल. पूर्वार्ध चांगला आहे. दुपारनंतर मानसिक त्रास संभवतो. विनाकारण शत्रुत्व निर्माण होऊ शकते.

. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *