राशिभविष्य

रवीवार, १२ जून २०२२.

जेष्ठ शुक्ल त्रयोदशी. उतत्र्यां, ग्रीष्म ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.

राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००

“आज प्रदोष आहे” शिव योग, विशाखा दिवस आहे.

चंद्रनक्षत्र – विशाखा

मेष:- धार्मिक कार्यात सहभागी व्हा. आत्मचिंतन करा. महत्वाची कामे आज नकोत.

वृषभ:- पूर्वार्धात कामे पूर्ण करा. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. प्रेमात अपयश येऊ शकते.

मिथुन:- संततीची चिंता लागून राहील. आज व्रतस्थ राहावे. चिंतन करावे.

कर्क:- संमिश्र दिवस आहे. नियोजन चुकू शकेल. कुलदेवतेची उपासना करा.

सिंह:- कामात अडथळे येतील दगदंग वाढेल. विश्र्नाती घ्या.

कन्या:- उत्तरार्ध काहीस अनुकूल आहे. चुकीचे निर्णय होण्याची शक्यता आहे. संयम बाळगा.

तूळ:- शब्द जपून द्या. महत्वचे निर्णय आज नकोत. काळजीपूर्वक आर्थिक नियोजन करा.

वृश्चिक:- कामे रेंगाळतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा. कुटुंबाची काळजी घ्या.

धनु:- दिवसाचा पूर्वार्ध काहीसा बरा आहे. या वेळेत कामे पूर्ण करा. गुंतवणूक टाळा.

मकर:- दिवस आळसात जाईल. दुपारनंतर व्यवहार होऊ शकतात. मात्र अपेक्षित यश मिळणार नाही.

कुंभ:- संमिश्र दिवस आहे. देवतेची उपासना करा. अचानक एखादी घटना घडेल. आरोग्या संबधित चिंता वाढेल.

मीन:- प्रवासात त्रास संभवतो. कामात अडथळे येतील. शक्यतो आराम करा.

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *