विसापूर येथे वीज पडून युवकाचा मृत्यू

 

कळवण : प्रतिनिधीं

कळवण शहर व तालुक्याच्या परिसराला शुकवारी ( दि . १० ) वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने कळवणकरांना अक्षरश : झोडपून काढले . तालुक्यातील विसापूर येथे वीज पडल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . कळवण शहर व तालुक्यात शुक्रवारी दुपारी ३ वाजता जोरदार पावसाचे आगमन झाले . वादळी वाऱ्यासह अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची काही काळ चांगलीच तारांबळ उडाली . शेतकऱ्यांची कांद्याच्या चाळी झाकण्यासाठी एकच लगबग झाली . तालुक्यातील विसापूर येथे दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास वादळी पावसात अंगावर वीज कोसळून बारकू गोपू सोनवणे ( ३६ ) या युवकाचा जागीच मृत्यू झाला . दुपारी ३ ते ६.३० असे सुमारे साडेतीन तास तालुक्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *