दुचाकीस्वार ठार; दोघे गंभीर जखमी
दिंडोरी : प्रतिनिधी
वणी-सापुतारा रस्त्यावर पांडाणे गावाजवळ सोमवारी (दि. 10)सायंकाळी साडेचारच्या सुमारास कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळून खाक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी (एमएच 15 जेव्ही 1259) वणीच्या दिशेने येत होती. त्याचवेळी कार (एमएच 41, एझेड 3498) सापुताराच्या दिशेने जात होती. पांडाणे गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकइतकी भीषण होती की, दुचाकीस्वार मंगेश पांडू कराटे (वय 49, रा. खोबळा, ता. सुरगाणा) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात विजय शेखरे (वय 21) आणि रेखाबाई विजय शेखरे (वय 20, दोघेही रा. खोबळा, ता. सुरगाणा), हे गंभीर जखमी झाले. यातील रेखाबाई शेखरे यांची प्रकृती अतिगंभीर असल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पांडाणे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात हलविले. अपघातानंतर दुचाकीने अचानक पेट घेतला. आगीमध्ये दुचाकी पूर्णपणे जळून गेली. वणी ग्रामीण रुग्णालयात जखमींना आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल महाले तसेच परिचारिका सविता ससाणे, शैला गावित आणि रुग्णालयातील कर्मचार्यांनी जखमींवर तातडीने उपचार केले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्याबाबत वैद्यकीय पातळीवर कार्यवाही करण्यात आली. कार चालक व कारमधील एक जखमी आहे. अपघाताची नोंद वणी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, हवालदार वसंत साबळे तपास करीत आहेत. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Horrific accident near Pandane on the Wani-Saputara road.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…