नाशिक

‘तो’ दबक्या पावलांनी आला अन् कुत्र्याला उचलून पसार झाला!

चांदवडच्या मुलींच्या वसतिगृहात बिबट्याचा शिरकाव

चांदवड : वार्ताहर
येथील ऐतिहासिक कालिकादेवी लेणीच्या पायथ्याशी असलेल्या शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात शुक्रवारी (दि. 7) मध्यरात्री दोनच्या सुमारास बिबट्याने थेट संरक्षक भिंत ओलांडून आत प्रवेश केला. वसतिगृहाच्या मुख्य दारासमोर बसलेल्या कुत्र्याची अवघ्या काही सेकंदांत शिकार करून बिबट्या पसार झाला. हा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून, या घटनेमुळे वसतिगृहातील विद्यार्थिनींमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

सीसीटीव्हीत कैद झाला थरार
मध्यरात्रीच्या शांततेत बिबट्या अत्यंत दबा धरून आवारात शिरला. दाराजवळ बसलेल्या कुत्र्याला क्षणाचाही विलंब न लावता जबड्यात पकडून त्याने तिथून धूम ठोकली. वसतिगृहातील एकमेव सुस्थितीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात हा संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट दिसला आहे.
परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असून, आम्हाला दररोज रात्री त्याच्या डरकाळ्या ऐकू येतात, अशी भीतिदायक माहिती वसतिगृहातील विद्यार्थिनींनी दिली. आतापर्यंत बिबट्या वसतिगृहाच्या बाहेरच असायचा; परंतु आता त्याने थेट आवारात प्रवेश केल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी बाहेर पडणेही आता धोक्याचे
बनले आहे.

पिंजरा लावण्याची मागणी
या घटनेनंतर वसतिगृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने खालील तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली जात आहे. वसतिगृहाच्या संरक्षक भिंतीवर तत्काळ तारेचे कुंपण घालावे. परिसरात अंधार असल्याने बिबट्याला लपण्यास सोपे जाते, त्यामुळे संपूर्ण आवारात प्रखर दिव्यांची सोय करावी. वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन परिसरात पिंजरा लावून बिबट्याला तात्काळ जेरबंद करावे.

 

‘He’ crept in stealthily, picked up the dog, and made off!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

20 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

20 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

20 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

20 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

20 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

20 hours ago