नवी दिल्ली : प्रतिनिधी
दक्षिण दिल्लीतील गजबजलेल्या मालवीय नगर (हौज राणी) परिसरातील एका रेस्टॉरंट आणि त्याच्यावरील हॉटेलला बुधवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत मोठी जीवितहानी झाली आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढून 21 वर पोहोचला आहे. मृतांमध्ये प्रामुख्याने मध्य आशिया आणि आफ्रिकेतील अनेक परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दुर्घटनेत 40 हून अधिक जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
सकाळी पावणेनऊच्या सुमारास ’फ्लोरिश स्टे बी अँड बी’ या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या ’लेमन ग्रीन रेस्टॉरंट’मध्ये आगीचा भडका उडाला. दिल्ली अग्निशमन दलाला सकाळी 8:48 वाजता याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलीस, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि कॅट्स रुग्णवाहिका यांच्या संयुक्त पथकाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. मात्र, आग इतकी भीषण होती की, ती वेगाने वरच्या मजल्यांवर पसरली. प्राण वाचवण्यासाठी काहींनी इमारतीवरून उड्या मारल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बचावलेल्या 40 हून अधिक जणांवर आणि जखमींवर सध्या नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शॉट सर्किटमुळे आग
दिल्ली पोलीस आणि महानगरपालिका यांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार आणि माजी आमदार सोमनाथ भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, जी नंतर रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरातून संपूर्ण इमारतीत आणि शेजारच्या हॉटेलमध्ये पसरली. हॉटेलचे बांधकाम, अग्निसुरक्षा नियमांचे पालन आणि परवानग्या या सर्व बाजूने पोलीस आणि दिल्ली पालिका कडून तपास सुरू आहे.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
या भीषण दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि नायब राज्यपाल तरणजीत सिंग संधू यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, दिल्ली सरकार बाधित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Hotel fire in Delhi; 21 dead
सिडको : प्रतिनिधी भाजीपाला खरेदीसाठी पायी जात असलेल्या 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि…
सिडको : प्रतिनिधी जेवण झाल्यानंतर घरासमोर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या 72 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची…
तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ…
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक…
सध्याचे मनुष्यबळ 1960 च्या निकषांवर आधारित; गुन्ह्यांच्या संख्येनुसार पोलीस ठाण्याचा गट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश नवी दिल्ली : प्रतिनिधी ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन…