नाशिक

अजून किती बळी जाण्याची वाट बघणार…

दिंडोरीत नागरिकांचा सवाल, रास्ता रोको; बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

दिंडोरी : प्रतिनिधी
बिबट्याच्या हल्ल्यात वनारवाडी येथील युवतीचा बळी जाऊन महिना होत नाही, तर दिंडोरी येथील पाच वर्षीय रुद्र अमोल जाधव यास घराजवळून आजोबांच्या हातातून बिबट्याने झडप घालून बळी घेतला. या घटनेनंतर अजून किती बळींची वाट बघणार, असे म्हणत संतप्त नागरिकांनी शनिवारी मध्यरात्री माजी आमदार धनराज महाले यांच्यासह सुमारे चार तास रास्ता रोको करत बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.
वनविभागाच्या अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत तीव्र भावना व्यक्त करत वेळीच उपाययोजना करा; अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा दिला. दिंडोरी येथे निळवंडी रोडलगत दत्तू जाधव यांच्या वस्तीवर शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दत्तू जाधव यांच्या हातातून त्यांचा नातू रुद्र जाधव यास बिबट्याने झडप घातली. त्यात गंभीर जखमी होत रुद्र मयत झाला. अधिकार्‍यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी बैठक घेत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करणे, विविध उपाययोजनेसाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल, परिसरात बिबट्या शोधमाहीम राबविण्यात येईल, असे आश्वासन मुख्य वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक उमेश वावरे यांनी दिले. पहाटे पोलीस उपविभागीय अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी आंदोलनस्थळी भेट देत नागरिकांची समजूत काढत बैठकीचे

भक्ष्य नसल्यावर बिबट्या कसा अडकणार?
तालुक्यात अनेक ठिकाणी पिंजरे लावले आहेत. मात्र, अनेक पिंजर्‍यांत भक्ष्यच वनविभागाकडून टाकले जात नाही. भक्ष्यच नसेल तर बिबटे पिंजर्‍यात कसे येतील, असा सवाल उपस्थित होत आहे. तालुक्यात वाडीवस्तीवर अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी वीजपुरवठा बंद असतो. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. दिंडोरीच्या घटनेवेळी लाइट गेले होते. घराबाहेर रस्त्यावर येताच अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने डाव साधला. आतातरी रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी होत आहे.
आश्वासन दिले.

सत्तर गावांत बिबट्याची दहशत
तालुक्यातील सुमारे सत्तर गावांमध्ये बिबट्याची प्रचंड दहशत असून, दररोज त्यांचा उपद्रव वाढत आहे. कुठे कुत्रे, मांजर, गाय, वासरू, शेळी, मेंढी आदी जनावरांवर हल्ले होत असताना, तालुक्यात डझनहून अधिक बालकांवर हल्ले झाले. त्यात त्यांना जीव गमवावा लागला. दिंडोरी तालुक्यात महिन्यात झालेल्या दुसर्‍या घटनेने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण असून, वनविभाग प्रशासनाने बिबट्याचा बंदोबस्त करणार की, अजून किती बळी जाण्याची वाट बघणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

वनविभागाची सर्च मोहीम फेल
वनारवाडी येथे युवतीवर केलेल्या बिबट्याच्या हल्ल्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विशेष सर्च मोहीम राबवणार असल्याचे सांगितले. मात्र, ही मोहीम प्रभावीपणेे राबविण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ड्रोन कॅमेर्‍यात अधिक बिबटे दिसत असले तरी एक बिबट्या पिंजर्‍यात अडकल्यावर मोहीम थंड झाली अन् बिबट्याने बालकावर हल्ला केल्याची चर्चा आहे. वनविभागाने अ‍ॅॅक्शन मोडवर येत विशेष सर्च मोहीम राबविण्याची मागणी आहे.

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago