नाशिक

करंजाळीत विहिरीत पडल्याने मुलीचा बुडून मृत्यू

सुरगाणा : प्रतिनिधी
तालुक्यातील करंजाळी येथील तेरा वर्षीय मुलीचा ठक्कर बाप्पा योजनेच्या विहिरीत पडून मृत्यू झाला. सविता शिवाजी भोये (वय 13) असे मृत मुलीचे नाव आहे.
सविता भोये मुखेड (ता. निफाड) येथील आदिवासी आश्रमशाळेत सहावीत शिकत होती. सविताच्या घराजवळ ठक्करबाप्पा योजनेच्या विहिरीचे सुमारे चार वर्षांपासून बांधकाम ठेकेदारामार्फत सुरू आहे. संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी वारंवार सूचना देऊनही विहिरीचे बांधकाम करीत नाहीत. विहीर सविताच्या घराजवळ आहे. पाय घसरून विहिरीत पडून बुडून तिचा मृत्यू झाला. विहीर खोल असल्याने पाणबुड्यांनी तिला बाहेर काढले. सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. सविताच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

करंजाळी गावात सुमारे चार वर्षांपासून कळवण प्रकल्पामार्फत ठक्कर बाप्पा योजनेची विहीर फक्त खोदकाम करून ठेवली आहे. तिचे बांधकाम अद्याप पूर्ण न केल्याने मुलीला जीव गमवावा लागला. यापूर्वीही अनेक वेळा गायी, बैल, जनावरे विहिरीत पडले आहेत. अधिकार्‍यांनी सखोल चौकशी करून संबंधित हलगर्जीपणा करणार्‍या ठेकेदारांवर कारवाई करावी.
-शिवाजी भोये, सविताचे पालक

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

18 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago