पावसाळ्यात आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण या काळात अनेक आजार आणि समस्या वाढतात. खालील गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही पावसाळ्याचा आनंद सुरक्षितपणे घेऊ शकता.
आरोग्याची काळजी ः
पाण्याचे सेवन ः पिण्यासाठी नेहमी शुद्ध आणि उकळलेले पाणी वापरा. बाहेर जाताना आपले स्वतःचे पाणी सोबत ठेवा. नळाचे किंवा विहिरीचे पाणी थेट पिऊ नका.
आहार : ताजे आणि गरम अन्न खा. फ्रिजमधील थंड पदार्थ, पेये आणि भाज्या टाळा. कारण यामुळे वात आणि कफ वाढू शकतो.
पचायला हलके आणि ताजे पदार्थ खा. जसे की, भात, गहू व भाजलेल्या डाळींपासून बनवलेले पदार्थ.
कडू, तिखट आणि तुरट चवीचे पदार्थ कमी खा. लसूण, आले, हिंग, हळद, मिरे यांसारख्या मसाल्यांचा आहारात योग्य वापर करा.
मांसाहार आणि मासे शक्यतो टाळा. कारण या काळात पचनशक्ती मंद असते आणि मांस दूषित होण्याची शक्यता असते.
हिरव्या पालेभाज्या शक्यतो टाळा किंवा खाताना खूप स्वच्छ धुवा. कारण त्यावर जीवाणू, विषाणू आणि अळ्या वाढण्याची शक्यता असते.
बाहेरचे उघड्यावरचे अन्न आणि शिळे अन्न खाणे टाळा. दूषित मांस आणि फळे (उदा. आंबे) खाऊ नका.
स्वच्छता ः
पावसात भिजल्यास लगेच अंग आणि केस कोरडे करा. बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ साबणाने धुऊन कोरडे करा. नियमित नखे कापा. संसर्ग टाळण्यासाठी हात वारंवार साबणाने धुवा. विशेषतः जेवण्यापूर्वी आणि शौचानंतर आल्यावर.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…