महाराष्ट्र

असेन मी नसेन मी… सोशल मीडियातून दिसेन मी !

मृत्यूपश्चात मीडिया अकाउंट्‌सचे करायचे काय?

 

नाशिक ः देवयानी सोनार

 

व्यक्ती मृत झाल्यानंतरही त्या व्यक्तीचे सोशल मीडिया अकाउंट अनेकदा सुरूच राहते. मृत पावलेल्या व्यक्तीचे वाढदिवस वा इतर पोस्टचे सोशल मीडियाकडून रिमाइंडर नोटिफिकेशन येत असल्याने अनेकदा मृत व्यक्तीलाही शुभेच्छा अथवा उदंड आयुष्याच्या शुभेच्छा, हॅपी बर्थडे असे मेसेज येतात. यामुळे मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकांनाही अकाउंटवर आलेल्या मेसेजमुळे मनस्ताप तर होतोच; शिवाय आठवणींचा बांधही फुटतो. मृत्यूनंतर या सोशल अकाउंटचे नेमके काय करायचे? याची माहिती नसल्याने व्यक्तीच्या मृत्यूनंतरही हे अकाउंट सुरूच राहत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

 

व्यसनमुक्ती केंद्राचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न

 

सोशल अकाउंटचा पासवर्ड जवळच्या व्यक्तीलाही बर्‍याचदा माहीत नसतो. त्यामुळे मृत्यूनंतर व्यक्तीचे अकाउंट तसेच सुरू राहते. जवळच्या नातेवाईक अथवा घरातील मंडळींनाही यासंदर्भात काही करता येत नाही.पासवर्ड आणि इतर गोपनीय माहिती एक डायरीत नोंद, सुरक्षित ठिकाणी किंवा वकिलाकडे करून ठेवले जाते का? याचाही विचार करायला हवा.

 

अमरावतीत खून करून पळला नाशकात सापडला

 

प्रत्येक सोशल मीडिया वेबसाईटची वेगवेगळी प्रणाली आहे. उदा. फेसबुक या साइटवर वारसा संपर्क (ङशसरलू उेपींरलींी) ची प्रणाली आहे. मृत्यूपूर्व तुम्ही तुमच्या अधिकृत व्यक्तींना मृत्यूपश्चात अकाउंट्स सुधारित करण्याची संधी देऊ शकतात. तसेच जर माझा मृत्यू झाला तर (ळष ख वळश).. अशी ही एक सुविधा फेसबुकने देऊ केलेली आहे. ज्यात व्हिडिओ किंवा एखादी पोस्ट तुम्ही मृत्यूपूर्व बनवून मृत्यूपश्चात वारसा संपर्कामार्फत अपलोड करू शकतात.

 

आमच्याकडे का पाहतोय विचारत टोळक्याचा दामपत्यावर हल्ला

 

गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. इंटरनेट, मोबाइलमुळे आभासी जग जवळ आले आहे. सोशल मीडियावर अनेकांचे अकाउंट्‌स असतात. सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जात असल्याने कागदपत्रे, फोटोज, इतर गोपनीय माहिती संग्रहित केली जाते. मृत्यूपश्चात आपले सोशल अकाउंट कोणी हाताळावे किंवा बंद करावे याबद्दल नातेवाईक किंवा घरातील सदस्यांना माहिती देण्याबाबत जागरूकता दिसून येत नाही.

 

जेलरोडला गाड्यांची तोडफोड

 

घरात माहिती असावी
अपघात, मृत्यू आयुष्यात काही घटना अचानक घडत असतात. त्यामुळे आपल्या संपत्ती, मालमत्ता, बँका, शेअर्स, लॉकर्स, मृत्युपत्रांसह सोशल मीडियाचेही अकाउंट्‌स त्याचे पासवर्ड्‌स याबद्दल नातेवाइकांना, कुटुंबातील सदस्यांना माहिती असल्यास अचानक झालेल्या मृत्यूनंतर वारसदारांना मदत होईल.

 

लाच घेताना महिला नायब तहसीलदार ,कोतवाल ताब्यात

 

मृत्यूनंतरही मेसेज
माणूस ऑनलाइन असला की जिवंत आहे असे समजावे, असे गमतीने म्हटले जाते. यातील गमतीचा भाग सोडला तर अनेकदा आपल्यालाही अनेकदा एखाद्या व्यक्तीचे व्हॉट्‌सऍप स्टेट्‌स किंवा लास्ट सीन दिसले नाही किंवा लास्ट सीन अनेक तास किंवा दिवसांचे असेल अशा वेळी कॉल, मेसेज करून विचारपूस केली जाते. परंतु कामानिमित्त सोशल मीडियावरील प्रत्येकालाच पूर्णत: ओळखत नसल्याने संबंधित व्यक्ती जिवंत आहे की मृत झाली? याबाबत कुणी लक्ष देत नाही. त्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याच्या फेसबुक वॉलवर बर्थडेचे मेसेज झळकत असतात.

 

सुदृढ समाज निर्मितीसाठी ब्राह्मण संघटनांनी  कार्य करावे

 

गैरवापर होऊ शकतो…
सोशल मीडिया अकाउंट्सचा मृत्यूपश्चात गैरवापर केला जाऊ शकतो. दिल्ली येथील आफताब श्रद्धा प्रकरणात आफताबने श्रद्धाचा खून केल्यानंतरही तिचे सोशल मीडिया अकाउंट सुरू ठेवले होते. त्यामुळे ती जिवंतच आहे, असा समज अनेकांनी करून घेतला होता.

 

ठाकरे गटाचे भाऊसाहेब चौधरी अखेर शिंदे गटात दाखल

सोशल मीडिया अकाउंट्स हे जंगम मालमत्तेत मोडत असल्यामुळे कायदेशीर वारसदार हे बाकी सोशल मीडिया अकाउंट्ससाठी मृत्युपत्र किंवा मृत्यूचा दाखला संबंधित वेबसाइटला पाठवून प्रक्रिया करू शकतात.
– डॉ. ऍड. प्रशांत माळी, सायबरतज्ज्ञ

फेसबुकवर त्याबाबत एक पर्याय असतो. ज्यामध्ये अकाउंटचा वारसा हक्क कोणाला द्यायचा म्हणजेच लीगसी सेटिंग्जचाही भाग महत्त्वाचा आहे. मात्र, जर आपण असा वारसा हक्क स्वतःहून कणाला दिला नसेल तर तुमच्या मृत्यूनंतर तुमचा डेटा कोणालाही मिळणार नाही. अगदी जवळच्या नातेवाइकांनाही नाही. लीगसी सेटिंगचे अधिकार जवळच्या नातेवाइकांना, मित्रमंडळींना सुपूर्द केल्यास तुमच्या फेसबुक अकाउंटचे रूपांतर श्रद्धांजलीत केले जाऊ शकते. सुरक्षायंत्रणा पोलीस आणि कोर्ट यांना त्यांच्या गरजेनुसार कोणाचाही डेटा हस्तगत करता येतो. तो अधिकार कायद्याने त्यांना बहाल केला आहे. आणि हा अधिकार फेसबुक नाकारू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. कारण त्याशिवाय फेसबुकच्या मदतीने करण्यात येणारे गुन्हे उघड होणारच नाहीत.
– ओंकार गंधे, सायबर सुरक्षातज्ज्ञ

 

 

लाचखोरी थांबेना, 500 रुपये लाच घेताना पोलिसाला पकडले

Devyani Sonar

Recent Posts

छावा संघटनेतर्फे येवला तहसील कार्यालयावर मोर्चा

नाशिक: प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांची तातडीने कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसाठी आज छावा संघटनेतर्फे येवला तहसील…

1 hour ago

छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन*

*छगन भुजबळ यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन* नाशिक: प्रतिनिधी श्रीराम नवमीच्या निमित्ताने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री…

24 hours ago

संडे अँकर: कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका

कर्जमाफी देऊ नका आणि जखमेवर मीठही चोळू नका महायुतीतील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस…

24 hours ago

अखेर कृषिमंत्री कोकाटे यांनी मागितली शेतकऱ्यांची माफी

नाशिक: प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री…

24 hours ago

पंचवटीतील पोलिसावर निलंबनाची कारवाई

अंमली पदार्थ विकणार्‍यांशी कनेक्शन उघड सिडको : विशेष प्रतिनिधी नाशिक पोलीस दलात मोठा घोटाळा उघडकीस…

2 days ago

अभिनेते मनोजकुमार यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबई: शोर, क्रांती, रोटी कपडा और मकान यासारख्या एकसे बढकर एक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा…

3 days ago