नाशिक भुषण पुरस्काराचे वितरण
नाशिक :प्रतिनिधी
निसर्गाला धरून चालायला हव.तर नैसर्गिक आपत्ती आणि वेगवेगळे आजार संपतील. मातीचे आरोग्य जपले तर आपले आरोग्य सुदृढ राहिल असे प्रतिपादन बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर सेवाभावी संस्था प्रतिष्ठान श्री संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्था ,समाजसेवक स्व.शंकरराव बर्वे प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित नाशिक भुषण पुरस्कार सोहळ्याप्रसंगी केले.
यावेळी खासदार हेमंत गोडसे,माजी आमदार बबनराव घोलप ,आमदार सत्यजित तांबे ,आमदार निलेश लंके ,
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक
शर्मिष्ठा घारगे वालावलकर ,
नाशिक एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत राहळकर,भक्ती चरणदास महाराज ,सावानाचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके, सावानाचे उपाध्यक्ष सुनील कुटे ,
संजय करंजकर ,मंगेश मालपाठक गणेश बर्वे,अमोल बर्वे उपस्थित होते.
राहीबाई पुढे म्हणाल्या ,
पुरस्कार घ्यायला आनंद होत नाही तर पुरस्कार देताना आनंद देतो. मी जे कार्य करते त्या कार्य करण्यास जर सर्वांनी सुरूवात केली तर शेती चांगली राहिल..
..आपण विषमुक्त भाजीपाला खायला हवा. त्यासाठी आपल्या दारात असलेल्या परसबागेत ,कुंडीत भाजीपाला लावायला हवा.
अध्यक्षीय मनोगतात बबनराव घोलप यांनी कर्मवीर काकासाहेब सोलापूरकरांच्या आठवणींना उजाळा दिला.
खासदार हेमंत गोडसे म्हणाले, या सोहळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यामुळे सर्वांना प्रेरणा मिळते.
यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणाले ,
सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवरांची कर्मभूमी नाशिक आहे. प्रत्येक क्षेत्रात काम करणार्या प्रोत्साहन द्यायला हवे. प्रेरणा मिळाली नाही पुढे जाण्याची उमेद राहत नाही.
यावेळी प्रा.दिलीप फडके म्हणाले,कौतुकाची थाप मिळणे गरजेचे असते .त्यामुळे अशा प्रकारच्या सोहळ्याचे आयोजन व्हायला.
या सोहळ्यात 25 जणांचा सन्मान करण्यात आला.
गौरवपत्र,शाल,स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी स्वप्नपूर्ती 2023 या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन आणि गायिका मनस्वी मालपाठक यांनी गणेश वंदना गात केली.प्रास्ताविक गणेश बर्वे यांनी केले.सुत्रसंचालन रविंद्र मालूजकर यांनी केले. तर आभार प्रशांत कापसे यांनी मानले.
यांचा झाला सन्मान
पां.भां.करंजकर,आमदार नीलेश लंके,गिरीष पालवे,राजेंद्र महाले,जयश्री खर्जुल,चंदन पुजाधिकारी,रावसाहेब मोरे,शरद पाटील,राजेंद्र पानसरे,बापूसाहेब पिंगळे,अजय सांगळे,भास्कर दिंडे, प्रतिभा औंधकर,अॅड .मुकुंद ढोरे,राम सुरसे, सागर विंचू,स्वाती जाधव, रियाज सैय्यद, सतीश देशमुख, अनुपकुमार जोशी ,विनोद केकाण,अशोक मोरे, राजेंद्र बोरसे, ज्योत्स्ना पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
कांदा निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्याने कांद्याचे बाजार भाव पडले राजू शेट्टी यांचा आरोप…
केवळ चर्चा, बोलणी कधी? शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…