मुख्यमंत्री शिंदे : मालेगाव जिल्हयाबाबत लवकरच निर्णय
मालेगाव : आमिन शेख
आनंद दिघे यांच्याबाबत काय घडले. याचा मी साक्षीदार आहे.वेळ आल्यावर बोलेल. परंतु मी जर मुलाखत दिली तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात भूकंप होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मालेगाव जिल्हा करण्याबाबत शासन सकारात्मक असून, याबाबत लवकरच मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल, मालेगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. राज्यात असलेले युतीचे सरकार हे सामान्य जनतेचे आहे. असेही ते म्हणाले. मालेगाव येथे जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी त्यांनी मालेगावकरांशी मनमोकळा संवाद साधला.
मालेगाव येथील पोलीस कवायत मैदानावर शनिवारी (दि.30) जाहिर सत्कार सोहळा पार पडला.
सोहळ्याप्रसंगी सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी कृषीमंत्री दादा भुसे, माजी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उदय सामंत, आ. सुहास कांदे, आ. किशोर पाटील, कृउबा सभापती राजेंद्र जाधव, प्रमोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. दोन तास उशिराने सुरु झालेल्या या सभेला मोठ्यासंख्येने जनसमुदाय उपस्थित होता. सभेच्या सुरुवातीला मालेगावकरांकडून मुख्यमंत्री शिंदे यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यात विराजमान असलेले सरकार हे जनकल्याणासाठी आहे. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत शिवसेना-भाजप या नैसर्गिक युतीतून सरकार स्थापन केले आहे. आगामी पंचवार्षीक निवडणुकीत शिवसेना-भाजपचे दोनशे आमदार निवडून येथील अशी असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. सरकार स्थापनेनंतर मी स्वत: आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर दौरा करीत आहोत. या दौर्यादरम्यान, नागरिकांना भेडसाविणार्या समस्या तत्काळ सोडविण्यात येत आहे. हे सरकार सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी असून शासनाच्या सर्व योजना तळागाळातील जनतेपर्यन्त पोहचविण्याचे काम आम्ही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मालेगावच्या विकासाबाबत बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या चार दशकांपासून मालेगाव जिल्हा निमिर्तीचा प्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. याबाबत लवकरच एक बैठक मंत्रालयात घेण्यात येणार आहे. नियोजित मालेगाव जिल्ह्यात ज्या-ज्या तालुक्यांचा समावेश करायचा आहे, तेथील लोकप्रतिनिधींशी देखील चर्चा करुन जिल्हा निमिर्तीबाबत योग्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय मालेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी कार्यवाही करणार आहे. केंद्राच्या माध्यमातून राज्यसरकार विकासात्मक योजना येथे राबविणार आहे. टेक्सटाईल सिटी असलेल्या मालेगावातील पॉवरलूम कारखानदारांच्या वीजेच्या अडचणी सोडविणार असून पॉवरलूम उद्योगाच्या पंखात बळ भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. कांदा उत्पादक शेतकर्यांना देखील अनुदान वाटपाचा लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. मालेगाव शहराचा अमृत दोन योजनेंतर्गत विकासासाठी भरघोस निधी पुरविणार आहे. याशिवाय येथील मलनिस्सारण केंद्राच्या उभारणीसाठी तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यावेळी सभास्थळी अनेक कार्यकर्त्यांचा तसेच धुळे जिल्ह्यातील काही पदाधिकार्यांचा शिंदे गटात प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मोठ्यासंख्येने जनसमुदाय सभेला उपस्थित होता.
ठाकरेंवर टीकास्त्र
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, शिवसेना आम्ही वाढविली. आम्ही आमच्या कुटुंबाला वेळ दिला नाही. रात्रंदिवस काम केले. राष्ट्रवादी व कॉंग्रेससोबत सत्ता स्थापन करुन बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली आणि आम्हाला गद्दार म्हणतात, धर्मवीर सिनेमा काही लोकांना रुचला नाही, पचला नाही. मी आज जाहीरपणे बोलणार नाही.आज ज्या मुलाखतीचा सपाटा लावला आहे. त्यावर मी बोलणार नाही. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल, त्यावेळी भूकंप होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…
निफाडला निचांकी ५.६ अंश तपमान निफाड।प्रतिनिधी निफाड शहरासह तालुक्यात पारा घसरण सुरुच आहे सोमवार दि…