80 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल; एकास अटक
नाशिक : प्रतिनिधी
दादरा नगर हवेली व दमण-दीव केंद्रशासित प्रदेशात निर्मित व केवळ तेथील विक्रीसाठी असलेला विदेशी मद्यसाठा महाराष्ट्र राज्यात अवैधरीत्या वाहतूक केला जात असल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने नाशिक जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे.
दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी चांदवड टोलनाका, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मंगरूळ शिवार (ता. चांदवड, जि. नाशिक) येथे वाहन तपासणीदरम्यान सहा चाकी टाटा कंपनीच्या ट्रक (क्रमांक-एम 48 सीबी 9908) ला अडविण्यात आले.
तपासणीदरम्यान ट्रकमध्ये दादरा नगर हवेली व दमण-दीव येथे निर्मित आणि केवळ तेथील विक्रीसाठी असलेला विदेशी मद्यसाठा 3,474 बाटल्या (397 बॉक्स) तसेच महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला 1,524 बाटल्यांचा (127 बॉक्स) मद्यसाठा आढळून आला. यासह एक मोबाइल फोनही जप्त
करण्यात आला.
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 80,10,280 इतकी आहे.
या प्रकरणी ट्रकचालक जगदीश बाबूलाल (वय 27 वर्षे, रा. सोनेरी, ता. सेडवा, जि. बाडमेर, राजस्थान) यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई डॉ. राजेश देशमुख, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, प्रसाद सुर्वे, संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच उषा वर्मा, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक प्रकाश गौडा, उपनिरीक्षक किरण धीदळे, सहाय्यक उपनिरीक्षक राहुल मोडक, किरण गांगुर्डे, जवान युवराज रतवेकर, महेश सातपुते, राहुल पवार, विलास कुमार तसेच महिला जवान सुनीता महाजन यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक किरण धिंदळे करीत आहेत.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…