नाशिक

त्रिमूर्ती चौकातील अवैध गॅस रिफिलिंग अड्डा उद्ध्वस्त

मनपाच्या जागेतच सुरू होता धंदा; लाखोंचा मुद्देमाल जप्त

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्ती चौक परिसरातील दत्तमंदिर बस थांब्याजवळ असलेल्या महापालिकेच्या बंद कत्तलखान्याच्या गाळ्यांत अंबड पोलिसांसह जिल्हा पुरवठा विभागाच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंगच्या धंद्यावर अखेर महापालिकेने धडक कारवाई केली. यावेळी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उंटवाडी येथील दत्तमंदिर स्मशानभूमी परिसरात हा प्रकार उघडपणे सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, या अवैध गॅस रिफिलिंगच्या काळ्या धंद्यावर मनपा कारवाई करू शकते, तर मग पोलिसांकडून ही कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. या अवैध धंद्यांना पाठबळ देणार्‍या ‘आका‘च्या विरोधात पोलीस कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उंटवाडी परिसरातील दत्तमंदिर स्मशानभूमीशेजारी महापालिकेच्या मालकीच्या स्लॉटर हाउसच्या जागेत अवैध गॅस सिलिंडर रिफिलिंगचा काळाबाजार सुरू असल्याचे उघड झाले आहे. या ठिकाणी घरगुती वापराचा गॅस सिलिंडरमधून गॅस काढून दररोज हजारो वाहनांमध्ये भरला जात असल्याची माहिती समोर आली आहे. वर्दळीच्या भागात आणि स्मशानभूमीच्या अगदी शेजारी हा धोकादायक प्रकार सुरू असल्यामुळे मोठा स्फोट होऊन जीवित व वित्तहानी होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र इतका गंभीर प्रकार सुरू असताना पोलीस प्रशासन आणि पुरवठा विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना होती. महापालिकेच्या जागेवरच हा अवैध धंदा सुरू असल्याची माहिती मिळताच मनपा उपायुक्त सुवर्णा दखणे आणि विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाच्या पथकाने सोमवारी छापा टाकला. या कारवाईत विविध क्षमतेचे गॅस सिलिंडर, रिफिलिंग मशिन, वायरिंग व अन्य साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सिडको परिसरात अवैध गॅस रिफिलिंगचे अड्डे उघडपणे सुरू आहेत. हे प्रकार पोलिसांच्या माहितीत नसावेत का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महापालिकेने पुढाकार घेत कारवाई केली असली तरी नागरिकांचा जीव धोक्यात घालणार्‍या या काळाबाजारावर पोलीस प्रशासन कठोर भूमिका कधी घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

दत्तमंदिर चौक येथील महापालिकेच्या स्लॉटर हाउसच्या जागेत अवैध गॅस सिलिंडर रिफिलिंग सुरू असल्याची माहिती मिळाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी कारवाई करत मुद्देमाल जप्त करून जागा मोकळी करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी मुद्देमाल पुरवठा विभागाकडे देत आहोत.
– नानासाहेब साळवे, मनपा विभागीय अधिकारी

त्रिमूर्ती चौक, दत्तमंदिर बस स्टॉप परिसर हा नेहमीच वर्दळीचा असतोे. अगदी मुख्य रस्त्यापासून 100 मीटर अंतरावर राजरोसपणे अवैधरीत्या रिक्षा आणि काळी-पिवळी टॅक्सी तसेच स्कूल वाहनांमध्ये गॅस रिफिलिंग केले जात असताना ही बाब मनपाच्या लक्षात येते, तर मग अंबड पोलिसांना का समजू नये, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिसांकडून या अवैध धंद्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे की, या धंद्याला अन्य कुणाचा राजाश्रय आहे, याचा शोध घ्यावा. या प्रकरणाच्या मुख्य ‘आका‘ला शोधून त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Illegal gas refilling station in Trimurti Chowk demolished

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

9 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

10 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

10 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

10 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

10 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

10 hours ago