संपादकीय

धुळवड लोकोत्सव हा सामाजिक एकतेचे प्रतीक

फाल्गुन हा शालिवाहन शके महिन्यातील शेवटचा महिना आहे. त्यामुळे होळी हा हिंदू दिनदर्शिकेनुसार येणार्‍या महिन्यातील शेवटचा सण असतो. होळी पेटवून दुसर्‍या दिवशी म्हणजे धूलिवंदनाच्या दिवशी जमिनीला, मातीला नमस्कार करण्याची प्रथा आहे. प्रत्येक प्राणिमात्राचा देह हा पंचमहाभूतांपासून बनलेला असतो. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असा या पंचमहाभूतांचा क्रम आहे. पृथ्वीपासून सुरुवात आणि आकाशापर्यंत शेवट असे पंचक असणार्‍या या तत्त्वांना आपल्या सणांमधून आदर व्यक्त करण्याचा एक दिवस म्हणजे धूलिवंदन. या दिवशी पृथ्वीला वंदन केले जाते. त्यानंतर 15 दिवसांनी नववर्षाला म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आकाशाला भिडणारी गुढी उभारण्याची पद्धत आहे.
या दिवशी सकाळी घरातील बायका पाण्याची पातेले, घागरी, हंडे पाण्याने भरून होळी पेटवलेल्या जागी ठेवतात. सूर्याच्या उन्हाने हे पाणी तापते. या पाण्याने लहान मुलांना आंघोळ घालतात. असे मानले जाते की, या पाण्याने आंघोळ केली असता लहान मुलांना किंवा कोणालाही उन्हाळा बाधत नाही. या दिवसात कैर्‍याही मिळू लागतात. कैर्‍या उकडून त्याचा गर लहान मुलांना अंगाला लावून स्नान घालतात. मोठी माणसे होळीवर पाणी शिंपडून ती राख कपाळाला लावतात, अंगाला फासतात व नंतर स्नान करतात. काही ठिकाणी आजकाल लोकांनी आपापल्या सोयीनुसार होळीच्या दुसर्‍या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरू केली आहे. त्यात लहान-मोठे, स्त्रिया-पुरुष सरसकट सगळे उत्साहाने रंग खेळतात; परंतु रंगपंचमी हा वेगळा सण आहे. वसंत ऋतूची चाहूल लागल्यामुळे या सुमारास झाडे नवीन पालवीने व विविधरंगी फुलांनी रंगीबेरंगी दिसत असतात. हवाही उष्ण झालेली असते. अशावेळी थंड पाणी अंगावर उडविणे सुखदायक असते. त्यामुळे रंगपंचमी हा सण सुरू झाला.
कुसुंबीच्या फुलांपासून काढलेल्या रंगाचे पाणी करून तसेच केशराचे पाणी करून ते एकमेकांच्या अंगावर उडविले जात असे. पेशवाईत तर हा सण शाही इतमामाने साजरा केला जात असे. रंगाच्या पिचकार्‍या भरभरून हत्तीवरून गुलाल आणि इतर कोरड्या रंगाची उधळण केली जात असे. आजकाल विविध प्रकारचे रंग पाण्यात कालवून ते एकमेकांवर उडवतात. विशेषत: तरुण स्त्री-पुरुषांना एकत्र येण्याची व थट्टामस्करी करण्याची संधी या सणामुळे मिळते; परंतु कालांतराने अश्लील शब्द उच्चारून शंखध्वनी करणे यासारख्या विकृत गोष्टीही या उत्सवात शिरल्या. आजकाल एखाद्या हौदातील पाण्यात रंग टाकून एकमेकांना त्यात डुबवून हसतखेळत या सणाची मजा लुटली जाते.
धूलिवंदन (धुळवड) हा होळीच्या दुसर्‍या दिवशी फाल्गुन वद्य प्रतिपदेला साजरा केला जाणारा रंगांचा आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी होळीची राख आणि माती अंगाला लावून पृथ्वीला वंदन करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात या दिवशी एकमेकांवर रंगपाणी आणि चिखल उडवून वसंत ऋतूचे स्वागत केले जाते. परस्परांतील मतभेद विसरून हा सण साजरा केला जातो. होळी पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी फाल्गुन वद्य प्रतिपदेस सकाळी धुळवड साजरी करतात. पहिल्या दिवशी पेटवलेल्या होळीच्या पवित्र राखेला वंदन करून ती अंगाला लावतात, ज्याला धूलिवंदन म्हणतात.
काही ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात चिखल उडवून धुळवड खेळली जाते. हा सण रंगप्रेम आणि वसंत ऋतूचे प्रतीक असून, समाजातील बंध म्हणजेच सामाजिक एकता मजबूत करतो.

Dhulwad Lokotsav is a symbol of social unity

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

7 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

7 hours ago