नाशिक

उत्तमनगरला रस्त्याच्या कडेला कचर्‍याचे ढीग

महापालिकेचे दुर्लक्ष; सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक महापालिका आरोग्य विभागाकडून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असताना दुसरीकडे काही नागरिकांकडून रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सिडको परिसरातील उत्तमनगर भागात उघड्यावरील कचर्‍याची समस्या गंभीर बनली आहे.
सिडकोतील उत्तमनगर परिसरातील बुद्धविहारालगत दररोज दुचाकी व चारचाकी वाहनातून येणारे काही जण राजरोसपणे कचरा टाकून जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिसरातून दररोज शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला ये-जा करीत असतात. मात्र कचर्‍याच्या ढिगार्‍यांमुळे येथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता मोहिमा, जनजागृती उपक्रम आणि दंडात्मक कारवाईचे नियम अस्तित्वात असतानाही प्रत्यक्षात मात्र अशा प्रकारांना आळा बसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करून याठिकाणी नियमित साफसफाई करण्यात यावी, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

Heaps of garbage on the side of the road in Uttamnagar

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago