28 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त
नाशिक : प्रतिनिधी
पेठ-नाशिक रोडवरील कोटंबी घाट परिसरात काल (11 डिसेंबर 2025) ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने अवैध दारू वाहतूक करणार्या वाहनावर कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला. एक आयशर ट्रक (क्रमांक 04-6974) मधून दमण येथे तयार होणारी, परंतु महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली विदेशी दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांना मिळाली होती.
गुप्त बातमी मिळताच पोलिस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक क्रमांक 4 चे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी तातडीने नाशिक येथून पेठकडे प्रयाण केले. कोटंबी घाटाच्या सुरुवातीस पथकाने सापळा रचत पंचांसह वाहन तपासणी सुरू केली. दुपारी साधारण 2 वाजता पेठच्या दिशेने भरधाव वेगात येणारा चॉकलेटी रंगाचा आयशर ट्रक संशयाच्या आधारे थांबवण्यात आला. वाहनचालकाची अंगतपासणी करून चौकशी केली असता त्याने स्वतःचे नाव दीपक संजय काळे (वय 25, रा. बोधेगाव, ता. दारवा, जि. यवतमाळ) असे सांगितले. गाडीमध्ये काही नाही, ती रिकामी आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे त्याने दिली. मात्र, पंचांसमक्ष घेतलेल्या तपासणीत पाठीमागील जागा रिकामी असली तरी ड्रायव्हर बाजूला बनवलेल्या गुप्त पत्र्याच्या कप्प्यात मोठ्या प्रमाणात विदेशी दारू आढळली. सदर विदेशी मद्याची किंमत एकूण 28,55,440 रुपये एवढी असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले. आरोपी दीपक काळे यास तत्काळ ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पेठ पोलिस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले असून, संबंधित वाहन व मुद्देमाल जप्त करून गुन्हा नोंदवण्यात
आला आहे.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…