नाशिक

कादवा नदीपात्रातून ट्रॅक्टरने अवैध वाळूउपसा

महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांचा रोष

नाशिक : प्रतिनिधी
निफाड गावातील कादवा नदीच्या दुबई परिसरातील पात्रातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने सर्रास अवैध वाळूउपसा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या प्रकाराकडे महसूल व पोलीस प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप शेतकरी व नागरिकांकडून केला जात आहे. उपशामुळे नदीपात्राची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.
कादवा नदी परिसरातील अनेक ठिकाणी ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे वाळूउपसा केला जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नदीपात्र खोलवर खोदल्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलत असून, काठावरील शेतजमिनी धोक्यात येत आहेत. आगामी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. ही चोरीची वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर गावातून व रहदारीच्या भागातून जोरात पळवतात. त्यामुळे पोलिस प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहतंय का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
अवैध उपशामुळे शासनाचा महसूल बुडत असतानाच स्थानिकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे. “वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नाही. तक्रारदाराचे नाव संबंधितांना समजतेच कसे? या बाबींमुळे प्रशासनाची निष्क्रियता संशयास्पद आहे,” असा रोष ग्रामस्थांनी व्यक्त केला. काही नागरिकांनी तर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैध वाळूमाफियांना मोकळे रान मिळाल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी संबंधित विभागाकडे विचारणा केली असता, “निवडणूक सुरू आहे, तक्रारींची दखल घेऊन तपास करण्यात येईल आणि दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाईल,” असे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात तातडीची ठोस कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा शेतकरी व नागरिकांनी दिला आहे. पर्यावरण रक्षणासाठी आणि कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी कादवा नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर त्वरित कारवाई करण्याची जोरदार मागणी परिसरातून होत आहे.

Illegal sand mining by tractor from Kadwa riverbed

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

4 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

4 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

4 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

4 hours ago