नाशिक

सातपूर औद्योगिक परिसरात अवैध वृक्षतोड; अज्ञातांविरोधात गुन्हा

सातपूर : प्रतिनिधी
सातपूर औद्योगिक वसाहतीतील भूखंड क्रमांक 19 येथे परवानगीशिवाय वृक्षतोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींंविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी जयवंत परशुराम पवार (वय 57, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नाशिक विभाग) यांनी फिर्याद दिली आहे. ते एमआयडीसीच्या नाशिक विभाग कार्यालयात कार्यरत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 एप्रिल 2025 पासून ते आजपर्यंत सातपूर औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक 19 येथील 170 झाडांपैकी काही झाडांची अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीर तोड केली. संबंधितांनी वृक्ष प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता झाडे तोडून त्यांची वाहतूक केली. वृक्षसंवर्धनाला हानी पोहोचवत शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आणि परिसराचे विद्रूपीकरण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तोडण्यात आलेल्या झाडांचे लाकूड अज्ञात ठिकाणी नेऊन त्याची विल्हेवाट लावल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 324, महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 चे कलम 8 व 21, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 15 तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा 1984 चे कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस करीत आहेत.

Illegal tree felling in Satpur industrial area; Case registered against unknown persons

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago