कागदावरचे कल्याणकारी महामंडळ तातडीने प्रत्यक्षात उतरवा!

वृत्तपत्र विक्रेत्यांचा धडक मोर्चाद्वारे एल्गार; अन्य मागण्यांकडेही वेधले शासनाचे लक्ष

नाशिक : प्रतिनिधी
वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे, ही गेल्या दोन दशकांपासूनची मागणी दोन वर्षांपूर्वी सरकारने मान्य केली. पुढे आश्वासनेही दिली. पण कागदावरचे हे महामंडळ प्रत्यक्षात उतरण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने आक्रमक झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांनी शुक्रवारी (दि. 9) राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार नाशिकमधील विविध वृत्तपत्र विक्रेता संघटनांनी नाशिकरोडच्या विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढून ‘केवळ कागदावरच असलेले कल्याणकारी महामंडळ तातडीने प्रत्यक्षात उतरवा!’ या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले.
विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना मोर्चाद्वारे देण्यात आलेल्या निवेदनात, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करून त्यासाठी अर्थसंकल्पात पुरेसा निधी उपलब्ध करावा, आरोग्यविमा व अपघात विमा योजना लागू कराव्यात, निवृत्तिवेतनाची व्यवस्था करावी आणि राज्यातील सर्व अधिकृत वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी तातडीने सुरू करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने 10 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यानंतर 11 मार्च 2026 रोजीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही माहिती व जनसंपर्क मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी पुढील अधिवेशनापूर्वी हे मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप या मंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही, ही खेदाची बाब आहे. शासनाला या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढला आहे.
या मोर्चाचे नेतृत्व नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील मगर, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे विभागीय संघटन सचिव महेश कुलथे, नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, जिल्हाध्यक्ष तथा नवीन नाशिक वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दत्ता ठाकरे आणि सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राजू अनमोला यांनी केले. ‘कल्याणकारी मंडळ आमच्या हक्काचे’, ‘इन्किलाब झिंदाबाद’, अशा घोषणांनी विभागीय आयुक्तालयाचा परिसर विक्रेत्यांनी दणाणून सोडला होता. या मोर्चात वृत्तपत्र विक्रेत्यांचे कुटुंबियही सहभागी झाले होते.

मोर्चात सहभागी झालेले वृत्तपत्र विक्रेते :
नाशिक शहरातील वृत्तपत्र विक्रेते व वितरक : देवदत्त जोशी, नाना कानडे, नामदेव सोनार, ज्ञानेश्वर धिले, महेश मणियार, उमेश करकरे, बाळासाहेब धोतरे, मोंटू लांडगे, व्यंकू गायकवाड, युसूफ शेख, बाळू नारायणे, संदीप मिश्रा, कैलास गिरणारे, हिराकांत कोरगावकर, पूनम लोंढे, रवींद्र सजगुरे, विश्वनाथ सजगुरे, प्रकाश सजगुरे, प्रकाश क्षीरसागर, ज्योती जगताप, बाळू रवळ, मंगेश डाहाळे, अशोक वाकळमाळी, सदाशिव बेंडके, सुधीर शिंदे, विजय थोरात, रवींद्र खैरनार, आशा जाधव, पंकज भदाणे, दिलावर टकले, देवानंद जोशी, राजेंद्र वागळे, ज्ञानेश्वर घागड, पांडुरंग जाधव, विनोद कपोते, चंद्रकांत पवार, अमोल जगताप, शरद टिळे, कैलास पवार, रमेश पवार, दीपक कचरे, प्रकाश कुलकर्णी, शरदकांत जाधव, पंकज जाधव, नितीन जाधव, महेश गांगुर्डे, कालू शेठ, आनंद लेले, मोहन जाधव, कैलास बराटे, मोहसिन सय्यद, खंडू मगर, ज्ञानेश्वर ठाकरे, दीपू गोसावी, रमेश शिरसाट, सुनील बाहीरकर, त्रिंबक कोठी, सुरेश सोनवणे, दत्तात्रय काळे, रमेश सावंत, नितीन बन, पुरुषोत्तम कोरे, विद्या पुजारी, नितीन मोरे, पप्पू जाधव, महेंद्र मोरे, सुरेशचंद्र पवार, संतोष डहाळे, महेश हिंगे, सुरेश्वर काळे, किरण पाडोळे, संदीप कचरे, चंद्रकांत राऊत, विमल गुजर, दत्ता पवार, विलास मोरे, शनेश्वर गवळी, संतोष मोरे, दशरथ स्वामी, महेश घाटे, दत्ता गांगुर्डे, बाळकृष्ण चौधरी.
नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्था : सुनील मगर, विजय सोनार, किशोर सोनवणे, इस्माईल पठाण, संजय ताजनपुरे, महेश कुलथे, अनिल कुलथे, उल्हास कुलथे, वसंत घोडे, संदीप डहाळे, अशोक पुढे, सुखदेव काळे, विशाल पागिरे, संदीप कळमकर, दत्ता मीराने, राजेंद्र शिंदे, किशोर शिंदे, चंद्रकांत रहाडे, विकास रहाडे, विजय गवारे, दगू पवार, विनायक मांडे, ज्ञानेश्वर गवळी, संदीप परसे, हर्षल लोखंडे, हर्षल ठोसर, सुखदेव जाधव, बाळासाहेब ढोमसे, प्रताप गांगुर्डे, कैलास मस्के, उत्तम गांगोडे, इब्राहिम खान, महेश हसे, संतोष गवळी, बाळकृष्ण चंद्रमोरे, सतीश आहेर, सचिन आडके, संपत निरभवणे, रवी सोनवणे, भारत सोनवणे, सुभाष आडभाई, राजेंद्र थोरमिसे, भारत माळवे, मधुकर सोनार, बंटी भालेराव, दीपक डहाळे, आनंद माळवे, सिद्धार्थ पगारे, अन्वर पठाण, संदीप मढवई, सुनील शिंदे, इसाक खान, विजय विसपुते, ऋषी आडभाई, बाबासाहेब ओहोळ, अनिल पोफळे, सुनील सूर्यवंशी, गौतम सोनवणे, शिरीष कर्णिक, अमोल शहाणे, संजय चव्हाण, दत्ता मीराणे, अनिल दिवे, मोहन कराडकर, हेमंत पोटे, बाळासाहेब वाडेकर, जुबेर पठाण, राजेश साळुंखे, योगेश भट, श्रीकांत मोरे, पप्पू शहाणे, विजय रोकडे, कमलाकर डमाळे, शशिकांत बोरसे, रवी भोसले.
वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्था, नवीन नाशिक (सिडको) : दत्ता ठाकरे, बाळू सूर्यवंशी, संजय शेलार, किरण गवळी, नितीन वाईकर, विजय मोरे, सतीश मथुरे, बाळू कुहिरे, संदीप महाजन, शुभम जाधव, आकाश कारे, गजू गोराडे, देवक आल्हाट, अर्जुन शिंदे, मिथुन बैरागी, रवींद्र वाघ, मयूर गांगुर्डे, सागर पडळ, प्रतीक कर्पे, तुकाराम पाटील, काशिनाथ चौधरी, बाळकृष्ण नेरे, श्रीनाथ आव्हाड, आकाश कोळप, संतोष जाधव, विनोद चव्हाण, संदीप क्षीरसागर, श्रीकांत शिंदे, महेश गांगुर्डे, सचिन शिंदे, गोविंद हिंगे, दादा हिंगे, प्रकाश राऊत, ईश्वर शिरसाट, नीलेश ठाकरे, दीपक थावरे, सचिन बागुल.
सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटना : राजू अनमोला, सचिन वरंदळ, सुरेशान शिंदे (मामा), शरद पावसे, संदीप जाधव, संतोष खैर, सागर अत्रे, संजय पाटील, राजकुमार कायरथा, सुरेश भांड, संदीप चौधरी, संदीप खैर, दीपक जाधव, संदीप अत्रे, पुरुषोत्तम कोरे.

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्या
♦ 10 ऑक्टोबर 2024 च्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार स्वतंत्र कल्याणकारी मंडळ प्रत्यक्ष व तातडीने सुरू करावे.
♦ मंडळाच्या विविध योजना सुरळीत चालवण्यासाठी शासनाने अर्थसंकल्पात पुरेशा भरीव निधीची तरतूद करावी.
♦ राज्यातील कष्टकरी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आरोग्य विमा, अपघात विमा आणि निवृत्तिवेतन (पेन्शन) योजना त्वरित लागू कराव्यात.
♦ राज्यातील सर्व अधिकृत वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी.

शासनाने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापनेच्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे विक्रेत्यांना दिलासा मिळण्याऐवजी प्रतीक्षाच करावी लागत आहे. शासनाने आता केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता मंडळ तातडीने कार्यान्वित करावे. – सुनील मगर, अध्यक्ष, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्था

महामंडळाच्या मागणीसाठी राज्यभरातील विक्रेते अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. मंत्रिमंडळाचा निर्णय आणि त्यानंतर देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता अधांतरीच राहिली आहे. या महामंडळासाठी स्वतंत्र निधी, प्रभावी प्रशासकीय यंत्रणा आणि विक्रेत्यांच्या नोंदणीची प्रक्रिया निश्चित करणे आवश्यक आहे.
– महेश कुलथे, विभागीय संघटन सचिव, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना

कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून वृत्तपत्रविक्रेत्यांना आरोग्य विमा, अपघात विमा आणि निवृत्तिवेतनासारख्या योजना लागू होणे गरजेचे आहे. विक्रेत्यांची अधिकृत नोंदणी झाल्यास शासकीय योजनांचा लाभ पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचू शकेल. शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून मंडळाची अंमलबजावणी तातडीने करावी.
– चंद्रकांत पवार, अध्यक्ष, नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटना

वृत्तपत्र विक्रेत्यांना सामाजिक आणि आर्थिक संरक्षण देण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली पाहिजे. जिल्ह्यातील सर्व पात्र विक्रेत्यांची नोंदणी करून त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल, अशी व्यवस्था शासनाने उभी करावी.
– दत्ता ठाकरे, जिल्हाध्यक्ष, वृत्तपत्र विक्रेता संघटना

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या श्रमांचा विचार करून शासनाने कल्याणकारी मंडळाची घोषणा प्रत्यक्ष कृतीत आणणे आवश्यक आहे. महामंडळ आणि विविध योजना लागू केल्यास हजारो विक्रेते व त्यांच्या कुटुंबांना आधार मिळू शकतो.
– राजू अनमोला, अध्यक्ष, सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटना

Immediately translate the welfare corporation—currently existing only on paper—into reality!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *