नाशिक

अमोनियम बायोकार्बोनेटनेच गणेशमूर्तीचे विसर्जन करा

मनपाचे आवाहन; विभागीय कार्यालयात व्यवस्था

नाशिक : प्रतिनिधी
गणेशभक्तांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असलेल्या गणेशमूर्तीचे अमोनियम बायोकार्बोनेटच्या मिश्रणामध्ये घरच्या घरी विसर्जन करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. दरवर्षी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांसाठी अमोनियम
बायोकार्बोनेट पावडर मोफत उपलब्ध करून दिली जाते. यंदाही नाशिकरोड, पंचवटी, नवीन नाशिक, पूर्व, पश्चिम, सातपूर या सहाही विभागीय कार्यालयात अमोनियम पावडरची व्यवस्था करून देण्यात आली आहे.
नाशिकची लोकसंख्या गेल्या दहा वर्षांत झपाट्याने वाढली आहे. त्यानुसार दरवर्षी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कला, संस्कृती, परंपरा आणि एकोपा याचं प्रतीक म्हणून श्रीगणेशोत्सवाकडे पाहिले जाते. सन 2025 श्री गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, अशी महानगरपालिकेची धारणा आहे. त्यामुळेच गणेशभक्तांना प्रदूषण टाळा आणि पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करा, असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. मात्र, गणेशोत्सव साजरा करताना पीओपी गणेशमूर्तीचा वापर टाळा व त्याऐवजी शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तीचा वापर करा, असे आवाहन केले होते. परंतु, शहरात मोठ्या संख्येने पीओपी गणेशमूर्तीची खरेदी करून बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, भाविकांनी निर्माल्य नदीमध्ये न टाकता निर्माल्य कलशाचा उपयोग करा. नदीचे प्रदूषण टाळा. थर्माकॉल व प्लास्टिकचा वापर टाळा, असे आवाहन नागरिकांना करण्यात
येत आहे.

अमोनियम पावडरसाठी यांच्याशी करा संपर्क

सुनील शिरसाट, विभागीय स्वच्छता निरीक्षक, नाशिक पूर्व विभाग, मो.9423179173
राजू गायकवाड, नाशिक पश्चिम विभाग, 9423179175
संजय दराडे, पंचवटी विभाग, 9763257778
संजय गांगुर्डे, नवीन नाशिक विभाग, 94231791710
संजय गोसावी, सातपूर, 9423179176
अशोक साळवे, नाशिकरोड विभाग 9423179172

 

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago