महाराष्ट्र

विल्होळीत भंगार गुदामाला भीषण आग

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिकच्या विल्होळी शिवारातील जैन मंदिराच्या पाठीमागील चौधरी यांच्या भंगार प्लास्टिक गुदामाला गुरुवारी संध्याकाळी अचानक आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. माहिती मिळताच तालुका पोलिस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला चार ते पाच अग्निशमन बंबांच्या मदतीने दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर आंशिक नियंत्रण मिळवण्यात यश आले; मात्र काही वेळानंतर पुन्हा ज्वाळा भडकल्या.
यानंतर सिडको, सातपूर, पंचवटी आणि अंबड येथून आणखी बंब मागवण्यात आले. एकूण 12 ते 15 अग्निशमन बंब घटनास्थळी कार्यरत होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उशिरापर्यंत आग पूर्णपणे नियंत्रणात आणता आली नव्हती.
चौधरी यांच्या मालकीच्या या गुदामात प्लास्टिकपासून विविध वस्तू तयार केल्या जात होत्या. प्लास्टिकचे प्रमाण जास्त असल्याने आगीने मोठ्या प्रमाणात रौद्ररूप घेतले. या आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानीचे नेमके मूल्यमापन अद्याप झालेले नाही. स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याच्या प्रयत्नांमध्ये मदत केली. घटनास्थळी प्रशासनाकडून सतत देखरेख सुरू असून, आग पूर्णतः आटोक्यात येईपर्यंत प्रयत्न सुरू राहतील.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago