विश्वस्तांच्या भूमिकेबद्दलही जोरदार टीका, सुटी असूनही शुकशुकाट
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
येथे दि. 1 मार्च रोजी परप्रांतीय भाविकाला झालेल्या मारहाणीचे पडसाद समाजमाध्यमांत उमटले आहेत. भाविकाला झालेली मारहाण पाहून अनेकांनी दर्शन न घेताच माघारी परतणे पसंत केले. येथील पूजाविधी आणि दर्शनासाठी केलेले बुकिंग रद्द करणार्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम येथील भाविकांच्या संख्येवर होत असल्याचे घटनेच्या तिसर्या दिवशी स्पष्ट झाले आहे.
मंगळवारी (दि. 3) शासकीय सुटी असतानादेखील येथे भाविकांचा ओघ कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याबाबत भाविकांमध्ये चर्चा होत आहे. मंदिराच्या दोनशे रुपये दर्शनबारीला शुकशुकाट होता, तर पूर्व दरवाजा दर्शनबारीदेखील रिकामी होती. समाजमाध्यमावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.
यात त्र्यंबकेश्वर येथे भाविक पर्यटनावर आधारित व्यावसायिकदेखील आरेरावी करत असल्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाविकाला झालेल्या मारहाणीचे समर्थन काही विश्वस्तांनी केले. याबाबतदेखील नाराजीचा सूर दिसत आहे. यात भाविकाची चूक असेल मात्र, त्याला माराहाण करण्याचा अधिकार कुणी दिला, असा सवाल उपस्थित होत आहे.
त्र्यंबक नगरपरिषदेने हे वाहनतळ मोफत उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे दर महिन्याला वीजबिल भरण्यासाठी सहाय्य म्हणून 8 ते 10 लाख रुपये दिले जातात. भाविकांच्या दानातून मिळालेला पैसा नगरपरिषद घेत असेल तर भाविकांना मोफत वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे मत येथे आलेल्या भाविकांनी व्यक्त केले आहे.
अवैध पार्किंगची पठाणी वसुली
काही महिन्यांपूर्वी येथे नगरपरिषद प्रशासन प्रवेश फीच्या नावाने टोल वसूल करत होते. याबाबत पत्रकारांना मारहाण झाल्यानंतर शासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतर भाविकांना सोसावा लागणारा भार कमी झाला. मात्र, अवैध पार्किंगच्या नावाने शहरात होत असलेली वसुली थांबलेली नाही. याबाबत शासनाने दखल घ्यावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे. शहरात प्रवेश करताना वाहने थांबवली जातात. मात्र, तेथे कोणताही फलक नसल्याने पाठीमागून येणारी वाहने त्यावर आदळतात आणि अपघात होत आहेत. भाविकांना वाहन उभे करण्यासाठी 200 ते 500 रुपये मोजावे लागत आहेत. शासनाच्या प्रसाद योजनेतून पाच कोटी रुपये खर्चाचे वाहनतळ उभारण्यात आले आहे. मात्र, तेथील परिस्थिती पाहता भाविक वाहने उभी करण्यास धजावत नाहीत.
Impact of the beating in Trimbak; Devotees turn away from Darshan
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…