महिला साथीदारही अटकेत; उपनगर पोलिसांत गुन्हा
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
फायनान्स कंपनीत डेप्युटी मॅनेजर असल्याची बनावट ओळख सांगून गरजू महिलांचा विश्वास संपादन करायचा आणि कर्जाच्या पडताळणीचे कारण देऊन सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून पोबारा करायचा. अशा भामट्याला आणि त्याला मदत करणार्या महिला साथीदाराला गजाआड करण्यात उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे फसवणुकीचे आणि साखळीचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, तब्बल 4 लाख 94 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
योगेश सतीश कदम (वय 32, रा. बाणगंगानगर, सुकेणे रोड, ता. निफाड) आणि शाहीन उस्मान शेख (वय 35, रा. चांदी चौक, ओझर, ता. निफाड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. एका पीडित महिला फिर्यादीने उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, महेश पाटील नाव सांगणार्या भामट्याने आपण फायनान्स कंपनीत डेप्युटी मॅनेजर असून, कर्ज मंजूर करून देतो, असे आमिष दाखवले. 6 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी बिर्ला हॉस्पिटल नाशिक-पुणे रोड परिसरात त्याने फिर्यादी महिलेला गाठले. कर्जाच्या तपासणीसाठी लागतील असे सांगून फिर्यादीचे 24 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेतले. हे दागिने मॅडमकडे तपासणीसाठी दिले असून, लगेच परत करतो, असे सांगून भामट्याने तिथून पळ काढला व मोबाइल बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त किशोर काळे, सहाय्यक आयुक्त, सहायक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, पोलीस निरीक्षक शांताराम डंबाळे, सुनील बडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस अंमलदार सूरज गवळी व योगेश जाधव यांनी तपास चक्रे फिरवली. यादरम्यान आरोपीने दिलेला मोबाइल क्रमांक बंद होता व तो एका ग्रामीण भागातील महिलेच्या नावावर असल्याचे समोर आले. आरोपीने वापरलेल्या दुचाकीवरही बनावट क्रमांक टाकून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता. कोणताही सुगावा नसताना पोलिसांनी घटनास्थळावरील 15 ते 20 सीसीटीव्ही कॅमेर्यांचे
फुटेज तपासले. त्यावरून आरोपी ओझर परिसरात राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलीस पथक ओझर येथे पोहोचले असता आरोपीचे खरे नाव योगेश कदम असल्याचे उघड झाले. तो एका महिलेसोबत दुचाकीवरून चांदोरीच्या दिशेने गेल्याचे समजताच पोलिसांनी मोबाइलच्या तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीचे लोकेशन छत्रपती संभाजीनगर रोड, नांदूर नाका परिसरात शोधून काढले. एका पानटपरीवर आरोपी दिसताच, पोलिसांची चाहूल लागून दोघे पळू लागले. पोलीस अंमलदार सूरज गवळी, योगेश जाधव व महिला पोलीस अंमलदार माधुरी गोसावी यांनी पाठलाग करून अत्यंत शिताफीने दोघांच्या मुसक्या आवळल्या. पोलीस ठाण्यात आणून पोलिसी हिसका दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. योगेश कदम हा फायनान्स कंपनीचा अधिकारी बनून गरजू महिलांशी ओळख वाढवायचा. त्यानंतर महिलांचे दागिने घेऊन ते आपली साथीदार शाहीन शेख हिच्याकडे चेकिंगसाठी ठेवले असल्याचे सांगून ते दागिने लांबवायचा.
तपासात आरोपी योगेश कदम हा अट्टल गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर यापूर्वी आडगाव पोलीस ठाण्यात चेन स्नॅचिंग आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच दोन महिन्यांपूर्वी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेली साखळी चोरीही या तपासात उघड झाली आहे.
आरोपींकडून सोन्याचे 20 ग्रॅमचे मंगळसूत्र, 4 ग्रॅमची सोन्याची साखळी व लॉकेट आणि 7 ग्रॅम सोन्याची लगड, ओप्पो कंपनीचा मोबाइल तसेच स्प्लेंडर प्लस (एमएच 15 डीएफ 2277) व स्प्लेंडर आय-स्मार्ट ( 15 2277) असा एकूण 4,94,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, निरीक्षक शांताराम डंबाळे, सुनील बडे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, रेखा घुगे, हवालदार विनोद लखन, संदीप पवार, सूरज गवळी, योगेश जाधव, सुनील गायकवाड, प्रशांत देवरे, गौरव गवळी, जयंत शिंदे, अनिल शिंदे, संदेश रगतवान, माधुरी गोसावी, हर्षदा कुलकर्णी यांनी कारवाई केली आहे.
Imposter ‘Deputy Manager’ who misappropriated jewelry put behind bars.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…