नाशिक

भोंदू अशोक खरातला पुन्हा सात दिवस पोलीस कोठडी

सिडको : प्रतिनिधी
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पहिल्या गुन्ह्यातील कोठडी संपल्यानंतर दुसर्‍या बलात्कार प्रकरणात न्यायालयाने त्याला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने बुधवारी (दि. 8) सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. सरकारी वकिलांनी दुसर्‍या गुन्ह्याच्या तपासासाठी कोठडीची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य केली.
सुरक्षेच्या कारणास्तव खरातला न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्यात आले नाही. जनक्षोभ लक्षात घेता विशेष तपास पथकाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याची उपस्थिती नोंदवली. तपास अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या अर्जानंतर न्यायालयाने या पद्धतीने सुनावणीस परवानगी दिली. कोर्टात चार मोठ्या स्क्रीनद्वारे आरोपी, न्यायाधीश आणि कामकाज एकमेकांना दिसत होते.
ऑनलाईन सुनावणीदरम्यान अशोक खरात गुलाबी टी-शर्टमध्ये, वाढलेल्या दाढीसह स्क्रीनवर दिसत होता. न्यायाधीशांनी त्याला नाव विचारले असता आवाज कमी आल्याने मोठ्याने बोलण्यास सांगितले. पुढे त्याचे वकील भाटे हेच त्याचे प्रतिनिधित्व करत आहेत का, असा प्रश्न विचारला असता त्याने होकार दिला. सुनावणीच्या शेवटी काही सांगायचे आहे का, असे विचारल्यावर त्याने काही नाही असे सांगितले.खरातच्या वकिलांनी सात दिवसांच्या कोठडीला विरोध करत ही घटना 2022 मधील असल्याचे व यापूर्वी 14 दिवसांची कोठडी झाल्याचे नमूद केले. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि आरोपीची कार्यपद्धती लक्षात घेता न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीचा आदेश दिला.

Impostor Ashok Kharat remanded in police custody for seven days

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago