सिडको : प्रतिनिधी
आर्थिक व लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अशोक खरात याच्या पत्नीविरोधात शिर्डी पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे कल्पना खरातला देशाबाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
अशोक खरात प्रकरण केवळ नाशिकपुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. महिलांवरील अत्याचार, आर्थिक गैरव्यवहार अशा विविध आरोपांना सामोरे जात असलेल्या खरातविरुद्ध एकामागोमाग एक गुन्हे दाखल होत आहेत. अनेक पीडित महिला पुढे येत असून त्यांनी लैंगिक शोषणाबरोबरच फसवणूक व आर्थिक व्यवहारांबाबतही तक्रारी नोंदवल्या आहेत.
तपासादरम्यान अशोक खरात सावकारकीचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले असून त्यात त्याची पत्नी कल्पनाखरात हिचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. यामुळे तिच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच कल्पना खरात फरार झाली आहे. दरम्यान, फरार असलेल्या कल्पना खरात हिच्याविरोधात शिर्डी पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. या नोटीसमुळे देशातील सर्व विमानतळांवर संबंधित व्यक्तीच्या परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. शिर्डीत अशोक खरात व त्याची पत्नी यांच्याविरोधात शेतकर्याची फसवणूक आणि सावकारकीसंदर्भात गुन्हा दाखल असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
Lookout notice issued against Kharat’s wife
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…