भारतात सप्टेंबरमध्ये ५ जी सेवा सुरू होणार

 

नवी दिल्ली : इंटरनेट सुविधा अधिक कार्यक्षम आणि वेगवान करण्यासाठी लवकरच भारतीयांना ५ जी सुविधेचा लाभ घेता येणार आहे . देशात ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यापर्यंत ५ जी सेवा सुरु होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे . सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , ५ जी लाँच झाल्यानंतर या तंत्रज्ञानामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे . याशिवाय जागतिक स्तरावरही भारताला याचा मोठा लाभ मिळणार आहे . अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ५ जी सेवा लवकरच सुरु होण्याची घोषणा केली होती . सीतारमण यांनी सांगितले होते की , २०२२ मध्ये खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या ५ जी मोबाइल सेवांसाठी आवश्यक स्पेक्ट्रम लिलाव आयोजित केला जाईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *