सिटीलिंकबसमध्ये महिलेचा विनयभंग
नाशिक : प्रतिनिधी
शहरात गेल्या काही दिवसात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला सुरक्षेचाही प्रश्न गंभीर झाल्याचे चित्र आहे. सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यानी महिलेचा विनयभंग केल्याची घटना निमाणी बसस्थानकात घडली आहे.
या घटनेबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार (दि.21)रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास सिटीलिंक बसमध्ये (MH 15 GV 8059 ) बसलेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आला.
याप्रकरणी सिटीलिंकचा कर्मचारी किशोर संपत तारगे (२१,रा.क्रांती नगर, गणेश चौक, पंचवटी, नाशिक) पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.