पहाटे सगळे गाढ झोपेत.. दबक्या पावलांनी ‘ते’ आले अन् घर साफ करून फरार झाले

पहाटे सगळे गाढ झोपेत.. दबक्या पावलांनी ‘ते’ आले अन् घर साफ करून फरार झाले

सातपूर : प्रतिनिधी

पहाटेच्या सुमारास सर्वजण साखर झोपेत असताना असं काही घडलं की संपूर्ण घर गोंधळात बुडालं. चोरट्यांनी त्यांचा प्रताप दाखवत मौल्यवान ऐवज लुटून नेला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पहाटे सगळे गाढ झोपेत.. दबक्या पावलांनी ते आले  मौल्यवान वस्तु घेऊन फरार झाले आहे, नाशिकमध्ये सध्या गुन्ह्यांचे सत्र वाढताना दिसत आहे. कधी चोरी, तर कधी लूटमार, दुकान लुटलं अशा वेगवेगळ्या घटना सतत कानावर येत असतात. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. गुन्हे रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस शर्थीचे प्रयत्न करत असतात. पण त्यानंतरही बऱ्याच प्रमाणात गुन्हे घडत आहेत.
अशीच एक घरफोडीची घटना सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिपंळगाव बहुला येथे आशोक संतु भावले यांच्या घरात घडली आहे. पहाटेच्या सुमारास सर्वजण साखर झोपेचा फायदा घेतला अन असं काही घडलं की संपूर्ण घर गोंधळात बुडालं. चोरट्यांनी त्यांचा प्रताप दाखवत मौल्यवान ऐवज लुटून नेला आणि घरच्या लोकांवर डोक्याला हात मारण्याची वेळ आली. सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिपंळगाव बहुला येथे अशोक  संतु भावले यांच्या घरात घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,
पहाटेच्या वेळी संपूर्ण भावले परिवार गाढ झोपेत असतानाच चोरट्यांनी त्यांचा प्रताप दाखवला. घरातील आतली कडी तोडून ते आत घुसले आणि पैशासह मौल्यवान वस्तु चोरी केली.
पहाटेच्या सुमारास भावले यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूस असलेला दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरात आल्यानंतर ते स्वयंपाक घरात शिरले आणि तेथील भांड्यांची उचकापाचक करून ती घराबाहेर आणून ठेवली. त्याचवेळी एका डब्यात ठेवलेले काही पैसे त्यांना मिळाले. चोरट्यांनी ते लंपास केले.
त्यानंतर बेडरूमची कडी तोडून आतमध्ये गाढ झोपेचा फायदा घेत मौल्यवान वस्तु देखील पळवले.

घटनास्थळी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे,पोलिस स्टेशनमधील अधिकारी घटनास्थळी दाखले झाले व त्यांनी तपास सुरू केला. सातपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात रात्री उशिरापर्यंत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू  होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *