नाशिक

कॉन्फरन्सच्या नावाखाली नागरी बँक्स असोसिएशनला गंडा

बनावट हॉटेल पावत्या दाखवून 2 लाख 94 हजार रुपयांची फसवणूक

सिडको : प्रतिनिधी
नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या कॉन्फरन्सचे नियोजन करण्याच्या बहाण्याने हॉटेल बुकिंगच्या बनावट पावत्या सादर करून 2 लाख 94 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या कॉन्फरन्सच्या आयोजनाच्या नावाखाली हॉटेल बुकिंगच्या बनावट पावत्या तयार करून 2 लाख 94 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अण्णासाहेब त्र्यंबकराव बडाख (वय 58, रा. नवजीवन पार्क प्रगती हौसिंग सोसायटी, द्वारका, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल दीपक रेवाळे (दीपक हॉलिडेज टूर्स अँड ट्रॅव्हल्स, एमएस स्पेस मॉल, खराळवाडी, पिंपरी-चिंचवड, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 डिसेंबर 2025 ते 18 जुलै 2026 या कालावधीत नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या गोविंदनगर येथील कार्यालयात हा प्रकार घडला. आरोपीने नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष व संचालक तसेच नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या पदाधिकार्‍यांचा विश्वास संपादन केला. नाशिक अर्बन बँक्स असोसिएशन कॉन्फरन्स 2026 चे नियोजन आपण करत असल्याचे सांगून हॉटेल बुकिंगच्या बनावट पावत्या तयार करून त्या फिर्यादीला दाखविल्या. त्यानंतर बँकेकडून 2 लाख 94 हजार रुपये घेत संबंधित रकमेचा अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.

In the name of conference, the Nagari Banks Association was scammed.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

35 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

38 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

52 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

56 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 hour ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 hour ago