नाशिक

वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे अपघातांचा धोका

वर्षभरानंतरही छाटणी नाही; मनपाचे दुर्लक्ष

सिडको : प्रतिनिधी
सातपूर परिसरातील पपया नर्सरी ते जाधव संकुल मार्गावरील दुभाजकांमध्ये वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याची मागणी वर्षभरापासून प्रलंबित आहे. लेखी तक्रार करूनही नाशिक महापालिकेच्या उद्यान विभागाने कोणतीही कारवाई न केल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे.
पपया नर्सरी ते जाधव संकुलकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुभाजकांमधील झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणात वाढून रस्त्यावर पसरल्या आहेत. त्यामुळे वळणावरून येणारी वाहने वेळेत दिसत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वर्षभरापूर्वी तक्रार करण्यात आली होती. मात्र, अद्यापही फांद्यांची छाटणी न झाल्याने नागरिकांनी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या निष्काळजीपणावर टीका
केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वाढलेल्या फांद्यांमुळे अनेक किरकोळ अपघात घडले आहेत. रात्रीच्या वेळी औद्योगिक वसाहतीतून ये-जा करणारे अवजड कंटेनर या फांद्यांना घासून जात असल्याने मोठा आवाज होतो. तसेच वाहनांचे नुकसान होण्याचाही धोका निर्माण
झाला आहे.
यासंदर्भात 27 ऑगस्ट 2025 रोजी सातपूर विभागीय कार्यालयात लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही उद्यान विभागाने कोणतीही कार्यवाही न केल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नागरिकांनी तातडीने फांद्यांची छाटणी करून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Risk of accidents due to overgrown tree branches.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 hour ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 hour ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago