नाशिक

ऐन उन्हाळ्यात बाणगंगा नदी खळखळली

आमदार बनकरांच्या प्रयत्नांना यश; नदीकाठच्या आठ गावांना दिलासा

मौजे सुकेणे : वार्ताहर
जूनचा दुसरा आठवडा उलटल्यानंतरही मान्सून लांबल्यामुळे संपूर्ण निफाड तालुक्याला ऐन उन्हाळ्यासारख्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर, पाण्यासाठी त्रस्त असलेल्या बाणगंगा नदीकाठच्या गावांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे.
निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बाणगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. कोरडीठाक पडलेली नदी पुन्हा एकदा खळखळून वाहू लागली आहे. यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण
झाले आहे.
पाण्याचा प्रश्न सुटणार
बाणगंगा नदीपात्रात पाणी प्रवाहित झाल्यामुळे नदीकाठच्या आठ गावांना थेट फायदा होणार आहे. ओझर, दिक्षी, दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, मौजे सुकेणे आणि कसबे सुकेणे या आठ गावांमधील पिण्याच्या पाण्याचा तीव्र टंचाईचा प्रश्न आता निकाली निघणार आहे. तसेच नदीकाठच्या विहिरी, कूपनलिका (बोअरवेल) आणि इतर स्थानिक जलस्रोतांची भूजलपातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
डाव्या कालव्याचे आवर्तन
सध्या कडक ऊन आणि पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे जलसंकट गडद झाले होते. ही परिस्थिती ओळखून आमदार बनकर यांनी जलसंपदा विभागाकडे तातडीने नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती.
प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घेत गंगापूर डाव्या कालव्याचे जून महिन्यातील शेवटचे आवर्तन बाणगंगा नदीत वळवले.

पशुपालकांना नवसंजीवनी

मान्सून लांबल्यामुळे पिके जळू लागली होती, तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र, नदीत पाणी आल्यामुळे आता पिकांना जीवदान मिळणार असून, पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. ऐन संकटकाळात पाण्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल नदीकाठच्या ग्रामस्थांनी व शेतकर्‍यांनी आमदार दिलीप बनकर आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.

In the summer, the river Banganga was overflowing

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 hour ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 hour ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago