नाशिक

‘पीएम-किसान’साठी ई-केवायसी अनिवार्य

30 जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण करा; नाशिक जिल्ह्यात 99 टक्के पडताळणी

मालेगाव : प्रतिनिधी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या लाभार्थी शेतकर्‍यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. 30 जून 2026 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न करणार्‍या शेतकर्‍यांना योजनेच्या पुढील हप्त्याचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कृषी विभागाने पात्र लाभार्थी शेतकर्‍यांनी मुदत संपण्यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
शेतकर्‍यांच्या सोयीसाठी कृषी विभागामार्फत गावोगावी विशेष ई-केवायसी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये लाभार्थींना आवश्यक मार्गदर्शन व तांत्रिक मदत दिली जात आहे. तसेच जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) येथे बायोमेट्रिक पद्धतीने अंगठ्याच्या ठशाद्वारेही ई-केवायसी करता येत आहे. ‘पीएम-किसान’ मोबाइल अ‍ॅपवरील फेस ऑथेंटिकेशन सुविधेच्या माध्यमातून शेतकरी घरबसल्यादेखील ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून पुढील हप्ता निश्चित करून घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात ई-केवायसी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, जिल्ह्यातील सुमारे 99 टक्के लाभार्थी शेतकर्‍यांची पडताळणी पूर्ण झाली आहे. प्रशासकीय अहवालानुसार केवळ एक टक्का लाभार्थी अद्याप प्रलंबित आहेत. बागलाण, चांदवड, देवळा, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, नाशिक, पेठ, सिन्नर आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये 99 टक्के ई-केवायसी पूर्ण झाली आहे. तर निफाड आणि येवला तालुक्यांनी 100 टक्के उद्दिष्ट गाठून आदर्श कामगिरी केली आहे.
आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यात ई-केवायसीची प्रगती 98 टक्क्यांपर्यंत पोहोचली असून, दोन टक्के लाभार्थी अद्याप प्रलंबित आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक प्रलंबित लाभार्थी सुरगाणा तालुक्यात असल्याची नोंद आहे. उर्वरित लाभार्थ्यांची ई-केवायसी लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकर्‍यांनी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या सेवा केंद्राशी किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

e-KYC mandatory for PM-Kisan

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

31 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

34 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

48 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

52 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

56 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 hour ago