नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर लासलगाव येथे कांद्याच्या माळा घालून आंदोलन

नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर लासलगाव येथे कांद्याच्या माळा घालून आंदोलन

आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

लासलगाव:-समीर पठाण

नाशिक,दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा पिंपळगाव बसवंत येथे होत आहे. सध्या जिल्ह्यात कांदाप्रश्नी शेतकरी व काही संघटना आक्रमक असल्याने सभास्थळी त्यांच्याकडून निषेध व्यक्त होण्याची शक्यता आहे.त्या पार्श्वभूमीवर लासलगाव येथे आज सकाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून जयदत्त होळकर(शरद पवार गट)यांच्या नेतृत्वाखाली कांद्याच्या माळा घालून निर्यातबंदी विरोधात जोरदार घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

दरम्यान लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे व पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हांडळ,पोलीस कर्मचारी सुजित बारगळ यांच्यासह सध्या वेशातील पोलिस कर्मचाऱ्यांनी जयदत्त होळकर यांच्यासह सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस कार्यालयात आणले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होई पर्यंत या आंदोलकांना पोलीस कार्यालयातच अटक करून अडकवून ठेवण्यात येईल असे समजते.

या आंदोलनात सहभागी झालेले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर,डॉ सुजित गुंजाळ,शिवसेनेचे शिवा सुराशे,राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ विकास चांदर,अफजल शेख,प्रवीण कदम,मधुकर गावडे,विकास रायते,महेश होळकर,संतोष पानगव्हाणे,गोकुळ पाटील,प्रमोद पाटील,भरत होळकर,राहुल शेजवळ,राहुल वाघ,मयूर बोरा यांच्यासह दहा ते बारा जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान लासलगाव पोलीस कार्यालयाने मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेणाऱ्या शहर विकास समितीचे काही कार्यकर्ते आणि परिसरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांना प्रतिबंधात्मक नोटीसा दिल्याची माहिती हाती आली आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

मराठी माणूस, ठाकरे ब्रँडमुळे सरकार झुकले

खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्‍यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…

12 hours ago

जिल्ह्यातील धरणांतून 1,44,053 क्यूसेक विसर्ग

धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…

12 hours ago

रेल्वे थांबवणार्‍यांकडून 42 हजारांचा दंड वसूल

चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…

12 hours ago

…तर अभिजात मराठी ज्ञानभाषा, जनभाषा

सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…

12 hours ago

दागिन्यांसाठी महिलेची हत्या

पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…

12 hours ago

कालव्यात फेकलेल्या कचर्‍यामुळे आरोग्य धोक्यात

अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…

12 hours ago