नियोजित वधुचे अफेअर उघड
विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन
नाशिक : प्रतिनिधी
नियोजित वधुचे अफेअर उघड झाल्यामुळे डिप्रेशनमध्ये गेलेल्या आयकर अधिकारी असलेल्या वराने लग्नाच्या दिवशीच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिकमध्ये आयकर अधिकारी असलेल्या हरेकृष्ण पांडे यांचा उत्तरप्रदेशातील एका युवतीबरोबर साखरपुडा झाला होता. साखरपुड्याच्या कार्यक्रमाला नियोजित वधुचा प्रियकरही हजर होता. या कार्यक्रमात नियोजित वधुने या प्रियकराला सर्वांसमोर मिठी मारली. त्यामुळे हे प्रेमसंबध उघड झाले. त्यानंतर वराने हा विवाह मोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नियोजित वधुने लग्न कर नाही तर हुंडा मागीतल्याच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर पांडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दि.18 रोजी त्यांचा वाराणसी येथे विवाह होणार होता. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.
लोकीचे वैकुंठ पंढरपूर येथे होणारा आषाढीवारीचा महामेळा महाराष्ट्राचे आध्यात्मिक व सांस्कृतिक संचित आहे. 12 व्या…
हाराष्ट्राचे आध्यात्मिक, परमार्थिक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे पंढरीची वारी. महाराष्ट्रात भीमा नदीतीरावर असणार्या लोकविख्यात पवित्र तीर्थक्षेत्र…
हाराष्ट्रात धर्माला फार महत्त्व दिले जाते. धर्मतेज जागवणारा पंढरीचा विठोबा हा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि…
साडी ही भारतीय परंपरेचा गोंधळलेला मोहक गंध. पण आजच्या काळात ती केवळ साडी न राहता,…
पावसाळा म्हणजे गारवा, सरींचा आनंद आणि त्याचबरोबर अनेक अडचणीही. यांपैकी एक मोठी समस्या म्हणजे कपड्यांवर…
चित्त सुप्रसन्न जे वेळ। तो पुण्यकाळ साधका॥ (एकनाथी भागवत अ. 19, ओवी 166) आपण गृहप्रवेश,…