नाशिकमध्ये लाचखोरीत वाढ येवल्यात लिपिक जाळ्यात

नाशिक: शहरासह जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकारात लक्षणीय वाढ झाली आहे, काल एकाच दिवसात पाच लाचखोरांना एसीबी ने लाच घेताना पकडले,
येवला येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून नक्कल काढून देण्याच्या मोबदल्यात 4 हजाराची लाच स्वीकारताना रणजित गुशिंवे या दुय्यम निबांधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकला अटक करण्यात आली.
कळवण तालुकात 2 दिवसापूर्वीच अभोना येथे एकजण लाच घेतानाची घटना ताजी असताना काल दिगर येथील तलाठी आणि कोतवाल यांना लाच घेताना पकडण्यात आले. वाळूच्या ट्रॅक्टरवर कारवाई करू नये, यासाठी तलाठी राधा भोये आणि कोतवाल हिरामण नाईक यांना 35 हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली, नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक प्रणिता पवार आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक केली आहे, आडगावला राजेश थेटे या पोलीस कर्मचाऱ्याला 2 हजाराची लाच घेताना पकडले आहे
2 दिवसांत सहाजण लाच घेताना पकडले असल्याने वाढत्या लाचखोरी मुळे सरकारी कार्यालयात चालणारी अडवणूक आणि त्यासाठी केली जाणारी लाच मागणी ऐरणीवर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *