आज शुन्य सावली दिवस :आज सावली सोडणार साथ

 जिल्ह्यात अनुभवता येणार   शुन्य सावली दिवस
नाशिक : प्रतिनिधी
आयुष्यात प्रत्येक जण वेगवेगळ्या टप्प्यावर साथ सोडून जातो. पण एक अशी गोष्ट जी आपली साथ कधीच सोडत नाही.  ती गोष्ट म्हणजे सावली. पण आता सावलीही आपली साथ सोडणार आहे. हो आश्चर्य वाटल पण हे खर आहे.आता सावलीही आपली साथ सोडणार आहे. आज जिल्हयात शुन्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणार्‍या सर्व भूभागावर सूर्य वर्षांतून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात. सूर्य आणि पृथ्वी ह्यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते, तिथे शून्य सावली दिवस घडतो. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा तसेच सूर्य दररोज 0.50 अंश सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर दोन दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येते. नाशिक जिल्ह्यात आज शून्य सावली दिवस आहे. 3 मे पासून सुरू झालेला शुन्य सावली दिवस 31 मे पर्यंत  राज्यातील विविध भागात अनुभवता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *