नाशिक

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत तात्पुरत्या स्वरूपात अंगणवाडीसाठी मानधन प्रकल्पावरील मुख्यसेविका, सेविका, प्रभारी सेविका, मदतनीस नियुक्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, त्यांना मानधनवाढ द्यावी, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. त्यानुसार मानधनवाढीचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला आहे.
महानगरपालिकेकडून शहरात 310 अंगणवाड्या चालवल्या जातात. सहाही विभागांतील बालकांना शिक्षणाचे धडे दिले जातात. अंगणवाडी मुख्यसेविका, प्रभारी सेविका यांच्या मानधनामध्ये प्रत्येकी 700 रुपये, प्रभारी सेविका यांच्या मानधनात प्रत्येकी 500 रुपये व मदतनीस यांच्या मानधनामध्ये प्रत्येकी 300 रुपये वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्ष 5 जून 2025 पासन वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास सध्याच्या मानधनानुसार येणार्‍या वार्षिक खर्चापेक्षा 29 लाख 19 हजार 600 रुपये इतका अतिरिक्त खर्च येणार आहे. सन 2025-26 च्या अंदाजपत्रकात अंगणवाडी कर्मचारी मानधनासाठी संगणक कोड 5066 आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कर्मचारी संख्या वाढीव मानधन

मुख्यसेविका               : 5 – 700 रुपये
प्रभारी मुख्यसेविका    : 1 – 700 रुपये
सेविका                       : 299 – 500 रुपये
प्रभारी सेविका            : 7 – 500 रुपये
मदतनीस                   : 287 – 300 रुपये

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago