नाशिक : विशेष प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर व परिसराचा पाणीपुरवठा बळकट करण्यासाठी शासनाच्या जलसंपदा विभागाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सुवर्ण नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या त्र्यंबक नगरपरिषदेसाठी गंगापूर धरण समूहाच्या गौतमी गोदावरी प्रकल्पातून वाढीव पाणी हक्क मंजूर करण्यात आला आहे.
शासनाने मंजूर केलेल्या नव्या कोट्यानुसार त्र्यंबक नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी अतिरिक्त पाण्याचा हक्क देण्यात आला आहे. गौतमी गोदावरी धरण जलाशयातून पिण्यासाठीचे 0.1279 दशलक्ष घनमीटर पाणी वाढीव मिळेल. वाणिज्यिक वापरासाठीचे 1.5792 दलघमी पाणी त्र्यंबकेश्वरला मिळेल.
पाण्याची गुणवत्ता : नागरिकांना पुरवण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य करण्याची संपूर्ण जबाबदारी त्र्यंबक नगरपरिषदेची राहील.
कराराची पूर्तता : पाणीपट्टीची थकबाकी पूर्ण भरल्यानंतरच संबंधित संस्थेसोबत सुधारित नमुन्यानुसार पाणी वापराचा करारनामा केला जाईल. तसेच जलस्रोत प्रदूषित करणार्या वापरकर्त्यांवर दंडात्मक कारवाईचे नियमही लागू राहतील. यामुळे त्र्यंबकेश्वर शहराच्या पिण्याच्या आणि व्यावसायिक पाण्याच्या गरजेला मोठा दिलासा मिळणार आहे.
महत्त्वाच्या अटी-शर्ती
पाच वर्षांची मुदत : शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षांच्या आत नगरपरिषदेने या मंजूर आरक्षणातून प्रत्यक्ष पाणीउचल सुरू करणे बंधनकारक आहे. तसे न झाल्यास हे पाणी आरक्षण रद्द होईल.
जुने आरक्षण रद्द
या नवीन पाणी आरक्षण मंजुरीसोबतच 23 ऑक्टोबर 1997 च्या जुन्या शासन निर्णयानुसार ’आंबोली लघु- पाटबंधारे तलावातून’ मंजूर असलेले 0.73 दलघमी पाण्याचे आरक्षण अधिकृतपणे रद्द करण्यात आले आहे.
Increased water from Gautami Godavari for Trimbakeshwar
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…