नाशिक

थाटामाटाला फाटा नोंदणी विवाहाकडे कल

नाशिक : प्रतिनिधी
महागाई, वाढता विवाह खर्च आणि साधेपणाला मिळणारे प्राधान्य यामुळे आता अनेक जोडपी पारंपरिक थाटामाटाच्या लग्नाऐवजी थोडक्यात विवाह करून थेट विवाह नोंदणी करण्याकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे. 1 जानेवारी ते 19 मे 2026 या कालावधीत जिल्ह्यात 716 विवाहांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यांपैकी 291 जोडप्यांनी फॉर्म-16 द्वारे विवाह झाल्याची नोंद केली आहे. 425 स्पेशल विवाहांची नोंद झाली आहे.
पूर्वी मोठ्या प्रमाणावर हॉल, बँड, डेकोरेशन, भोजनव्यवस्था आणि इतर खर्चिक परंपरांवर भर दिला जात होता. मात्र, आता अनेक तरुण-तरुणी आणि कुटुंबे अनावश्यक खर्च टाळून साध्या पद्धतीने विवाह करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यानंतर कायदेशीर वैधतेसाठी विवाह नोंदणी केली जात असल्याने नोंदणी कार्यालयांमध्येही गर्दी वाढू लागली आहे.
विशेष विवाह अधिनियम तसेच हिंदू विवाह अधिनियमांतर्गत विवाह नोंदणीची प्रक्रिया आता तुलनेने सोपी आणि जलद झाल्याने नागरिकांचा प्रतिसाद वाढत आहे. ऑनलाइन प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची सुलभता आणि कमी खर्च या कारणांमुळे विवाह नोंदणी अधिक लोकप्रिय होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सामाजिक बदल, आर्थिक बचत आणि कायदेशीर सुरक्षितता या तिन्ही कारणांमुळे पुढील काळातही विवाह नोंदणीचा कल अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Trend towards registered marriages, breaking the hype

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago